Anganwadi Bharti Maharashtra 2023 : महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी भरती 2023 सुरु झाली असून, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांच्या राज्यभरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जवळपास 20 हजार 601 पदे भरण्यात येत आहे, महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अंगणवाडी भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे, सविस्तर पाहूया..
- अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांसाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- अंगणवाडी भरती साठी आवश्यक वयोमर्यादा ही 18 ते 35 वर्ष आहे. (विधवा उमेदवारांसाठी 40 वर्ष)
- लहान कुटुंब पात्रता आवश्यक (उमेदवारास जास्तीत जास्त दोन अपत्य असावीत)
- मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
- याव्यतिरिक्त जाहिरातीमध्ये नमूद इतर पात्रता असणे आवश्यक राहील.
अंगणवाडी सेविका भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक पात्रता संबंधित (सर्व कागदपत्रे)
- जन्म दाखला
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र (असल्यास)
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास )
- स्थानिक रहिवासी असलेल्या बाबतचा दाखला
- जाहिरातीमध्ये नमूद संबंधित कागदपत्रे
अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका पगार
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात घोषित केल्याप्रमाणे सुधारित पगार पुढीलप्रमाणे
- अंगणवाडी सेविका - 10 हजार रुपये
- मिनी अंगणवाडी सेविका - 7200 रुपये
- अंगणवाडी मदतनिस - 5525 रुपये
अंगणवाडी भरती सुरू, येथे करा अर्ज
अंगणवाडी भरती प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविली जाते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष एकात्मिक बाल विकास या (ICDS) कार्यालयात जाऊन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही लगेच तुमच्या तालुका/मनपा क्षेत्रातील एकात्मिक बाल विकास (ICDS) या कार्यालयात जाऊन जाहिरातीची संपूर्ण माहिती घ्यावी आणि अर्ज सादर करावे.
अंगणवाडी भरती 'सातारा' जाहिरात फॉर्म सुरु
अंगणवाडी भरती सातारा जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची एकूण 59 जागांसाठी जाहिरात देण्यात आली आहे.
- अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जून 2023
नोट - जाहिरात काळजीपूर्वक वाचून इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.
अंगणवाडी भरती सातारा जाहिरात व फॉर्म डाउनलोड करा
अंगणवाडी भरती 'लातूर' जाहिरात फॉर्म सुरु
अंगणवाडी भरती लातूर जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची एकूण 38 जागांसाठी जाहिरात देण्यात आली आहे.
- अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जून 2023
नोट - जाहिरात काळजीपूर्वक वाचून इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.
अंगणवाडी भरती लातूर जाहिरात व फॉर्म डाउनलोड करा
अंगणवाडी भरती 'बुलढाणा' जाहिरात फॉर्म सुरु
अंगणवाडी भरती बुलढाणा जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची एकूण 317 जागांसाठी जाहिरात देण्यात आली आहे.
- अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जून 2023
नोट - जाहिरात काळजीपूर्वक वाचून इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.
अंगणवाडी भरती बुलढाणा जाहिरात व फॉर्म डाउनलोड करा
अंगणवाडी भरती 'अहमदनगर' जाहिरात फॉर्म सुरु
अंगणवाडी भरती अहमदनगर जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची एकूण 21 जागांसाठी जाहिरात देण्यात आली आहे.
- अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 3 जुलै 2023
नोट - जाहिरात काळजीपूर्वक वाचून इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.
अंगणवाडी भरती अहमदनगर जाहिरात व फॉर्म डाउनलोड करा
अंगणवाडी भरती 'वाशीम' जाहिरात फॉर्म सुरु
अंगणवाडी भरती वाशीम जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची एकूण 17 जागांसाठी जाहिरात देण्यात आली आहे.
- अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 जुलै 2023
नोट - जाहिरात काळजीपूर्वक वाचून इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.
अंगणवाडी भरती वाशीम जाहिरात व फॉर्म डाउनलोड करा
अंगणवाडी भरती शासन निर्णय 2023 येथे डाउनलोड करा
अंगणवाडी भरती - महत्वाचे
अंगणवाडी भरती प्रक्रिया सुरु झाली असून, ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबविली जाते. काही जिल्ह्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून, काही जिल्ह्यात जाहिराती प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे तुम्ही अधिकृत माहिती प्रत्यक्ष तुमच्या तालुका/मनपा क्षेत्रातील एकात्मिक बाल विकास (ICDS) या कार्यालयात जाऊन जाहिरातीची संपूर्ण माहिती घ्यावी आणि अर्ज सादर करावे. [अंगणवाडी निवड प्रक्रिया पहा]
इतर महत्वाच्या बातम्या
नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.