7th Pay Commission Pay Scale : सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आलेली आहे, मात्र अद्याप पर्यंत काही कर्मचाऱ्यांना नवीन वेतनसंरचना लागू करण्यात आलेली नव्हती, त्यामध्ये आता सुधारणा करून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारीत वेतन संरचना लागू करण्याबाबत दिनांक 8 जून 2023 रोजी शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी लागू
राज्यातील भोसला मिलिटरी स्कूल, नशिक या संस्थेतील अधिकारी/कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारीत वेतन संरचना लागू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
भोसला मिलीटरी स्कूल, नाशिक या संस्थेतील सर्व पदांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारीत वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे. आता समादेशक, चीफ ट्रेनिंग ऑफिसर, ट्रेनिंग ऑफिसर, असिस्टंट ट्रेनिंग ऑफिसर, आणि मेस मॅनेजर या पदांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. [सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी येथे पहा]
सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी
भोसला मिलीटरी स्कूल, नाशिक या संस्थेतील समादेशक, चीफ ट्रेनिंग ऑफिसर, ट्रेनिंग ऑफिसर, असिस्टंट ट्रेनिंग ऑफिसर, आणि मेस मॅनेजर या पदांना पुढीलप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे.
या पदांना सुधारित वेतनश्रेणीमधील वेतन निश्चिती शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या नियमानुसार थकबाकी अदा करण्याबाबत कळविण्यात आले आहे. [शासन निर्णय येथे पहा]