ZP Bharti 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी जिल्हा परिषद भरती 2023 संदर्भात महत्वाची बातमी, जिल्हा परिषदेतील भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, आता जिल्हा परिषद अंतर्गत भरण्यात येणाऱ्या 18 हजार 939 पदांसाठी जाहिरात देण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहे, याबाबत ग्राम विकास विभागाने सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत 18 हजार 939 पदांसाठी मेगा भरती
राज्यातील जिल्हा परिषद सरळसेवा भरती 2023 अंतर्गत 18 हजार 939 जागांच्या पदांसाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे, यामध्ये जवळपास 39 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत ग्राम विकास विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यानुसार आता ZP Bharti 2023 भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य सरकारने सुमारे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा सरकारने संकल्प केला असून, ही पदे 15 ऑगस्ट 2023 पूर्वी भरण्यात येणार आहे. यांतर्गत Zilla Parishad भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषदांतील विविध संवर्गातील एकूण 18 हजार 939 जागांची मेगा भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. ही भरती एकाच वेळी होणार असून, उमेदवारांना वयोमर्यादेत दोन वर्षाची सूट दिली जाणार आहे. (ZP Bharti 2023)
जिल्हा परिषद पदभरतीचा अभ्यासक्रम निश्चित
जिल्हा परिषद अंतर्गत गट- क मधील सर्व संवर्गातील (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेची रिक्त पदे भरण्याबाबत ग्रामविकास विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम नुकताच शासनाने जाहीर केलेला आहे. सविस्तर अभ्यासक्रम येथे पहा..
जिल्हा परिषद पदभरती मध्ये उमेदवारांना वयाबाबत 2 वर्षाची सूट
ग्राम विकास विभागाच्या 16 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार वयाबाबत दोन वर्षाची सुट ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे. ZP Bharti 2023
जिल्हा परिषद पदभरती जाहिरात देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी
जिल्हा परिषद भरतीच्या बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी आता दिलासादायक बातमी आहे. ZP Bharti 2023 अंतर्गत 18 हजार 939 पदांसाठी जाहिरात देण्याबाबत ग्राम विकास विभागाने 15 मे 2023 रोजी जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांसाठी जाहिरात देण्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे.