Zilla Parishad Bharti Syllabus 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, राज्यातील जिल्हा परिषद सरळसेवा भरती 2023 अंतर्गत 18 हजार 939 पदांसाठी जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे, या मध्ये जवळपास 39 पदांसाठी जिल्हा परिषद भरती होणार आहे, या भरतीसाठी प्रश्नत्रिकेचे स्वरूप, काठिण्य पातळी, अभ्यासक्रम, वेळ निश्चित करण्यात आली आहे, त्यानुसार आता विद्यार्थ्यांना तयारीला लागावे लागणार आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी सविस्तर पाहूया.
जिल्हा परिषद अंतर्गत 18 हजार 939 पदांसाठी मेगा भरती
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त सरकारने सुमारे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा सरकारने संकल्प केला असून, ही पदे 15 ऑगस्ट 2023 पूर्वी भरण्यात येणार आहे. यांतर्गत Zilla Parishad भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषदांतील विविध संवर्गातील एकूण 18 हजार 939 जागांची मेगा भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. ही भरती एकाच वेळी होणार असून, उमेदवारांना वयोमर्यादेत दोन वर्षाची सूट दिली जाणार आहे. (Zilla Parishad Bharti )
जिल्हा परिषद पदभरतीचा अभ्यासक्रम निश्चित
जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातील पदांसाठी दि. 5 जुलै 2014 च्या शासन निर्णयामध्ये प्रत्येक संवर्गासाठी परीक्षेची काठीण्य पातळी ठरवून देण्यात आली होती. मात्र सदरची काठीण्य पातळी प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी पुरेशी नसल्यामुळे परीक्षेचा अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याने मा.अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28 एप्रिल व 29 एप्रिल 2023 रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सविस्तर येथे वाचा..
जिल्हा परिषदेतील भरतीसाठी अभ्यासक्रम, प्रश्न, गुण, वेळ व परीक्षेचे स्वरूप 'या' प्रमाणे असणार
- मराठी - 15 प्रश्न (30 गुण)
- इंग्रजी - 15 प्रश्न (30 गुण)
- सामान्य ज्ञान - 15 प्रश्न (30 गुण)
- गणित व बुद्धिमापन -15 प्रश्न (30 गुण)
- तांत्रिक प्रश्न - 40 प्रश्न (80 गुण)
- एकूण प्रश्न - 100 प्रश्न (200 गुण)
- वेळ - 2 तास (120 मिनिटे)
जिल्हा परिषद अंतर्गत 'या' पदांसाठी भरती होणार
- आरोग्य सेवक (पुरुष)
- आरोग्य सेवक (महिला)
- औषध निर्माण अधिकारी
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु. / लघु पाटबंधारे / यांत्रिकी / विद्युत)
- कनिष्ठ आरेखक
- कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)
- कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
- पशुधन पर्यवेक्षक
- रिगमन (दोरखंडवाला)
- लघुलेखक (उ.श्रे.) / लघुलेखक (नि.श्रे.) / लघुटंकलेखक
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (स्थापत्य / लघु पाटबंधारे)
- आरोग्य पर्यवेक्षक
- कनिष्ठ लेखाधिकारी
- पर्यवेक्षिका
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)
- वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
- विस्तार अधिकारी (कृषि)
- विस्तार अधिकारी (पंचायत)
- विस्तार अधिकारी (शिक्षण)
- विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
- कंत्राटी ग्रासेवक
- आरोग्य पर्यवेक्षक
- आरोग्य सेवक (पुरूष)
- आरोग्य सेवक (महिला)
- औषध निर्माण अधिकारी
- कंत्राटी ग्रासेवक
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु. / लघु पाटबंधारे)
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
- कनिष्ठ अभियंता (विद्युत)
- कनिष्ठ लेखाधिकारी
- जोडारी
- तारतंत्री
- पशुधन पर्यवेक्षक
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
- विस्तार अधिकारी (कृषि)
- विस्तार अधिकारी (शिक्षण)
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (स्थापत्य / लघु पाटबंधारे)