Two Thousand Note News : सर्वांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी, भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने 19 मे 2023 रोजी दोन हजाराची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, याबाबतचे अधिकृत प्रेस नोट जाहीर केली असून, त्यानुसार आता RBI ने दोन हजारांच्या नोटा जारी करणे तात्काळ थांबवण्याचे आदेश बँकांना दिले आहेत, सर्व सामान्य नागरिकांना दोन हजारांच्या नोटा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकेतून बदलून घ्याव्या लागणार आहे, सविस्तर बातमी पाहूया..
दोन हजाराची नोट चलनातून बाहेर, आरबीआयचा मोठा निर्णय
केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी चलनातील रु 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यामुळे अर्थव्यवस्थेतील चलनाची गरज त्वरित पूर्ण करण्यासाठी दोन हजार रुपयाची नोट चलनामध्ये आणली होती. रिझर्व बँक ऑफ इंडिया कायदा 1934 च्या कलम 24 (1) नुसार 2016 मध्ये ₹2000 ची नोट चलनात जारी करण्यात आली होती. (Two Thousand Note News)
चलनामध्ये आता इतर मूल्याच्या नोटा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध झाल्यामुळे आणि वस्तुतः दोन हजाराची नोट जास्त प्रमाणात व्यवहारात वापरली जात नसल्यामुळे सन 2018 19 पासून 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आलेली आहे.
त्यामुळे आता रिझर्व बँक ऑफ इंडिया ने स्वच्छ चलन धोरणाचा पाठपुरावा म्हणून दोन हजाराची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन हजाराच्या नोटा 23 मे पासून बदलता येणार
आरबीआय ने दोन हजाराची नोट वितरणातून मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सर्वसामान्य नागरिकांना 23 मे 2023 पासून 2000 रुपयांच्या नोटा बँकेमध्ये जाऊन विनामूल्य बदलून घेता येणार आहे.
- 23 मे 2023 पासून बँकेत जाऊन नोटा बदलता येणार
- नोटा बदलून घेण्यासाठी एका वेळी 20000 रुपयाची मर्यादा आहे. (एका वेळी 10 नोटा बदलून मिळणार)
- बँक खात्यात 2 हजार रुपयांच्या नोटा रक्कम जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.
- 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा बदलता येणार आहे.
30 सप्टेंबर नंतर पुढे काय?
Rs 2000 currency note will remain legal tender after 30th September too. RBI expects that 4 month time is enough for people to exchange notes with the banks. Most of the Rs 2000 notes that are in circulation will return to banks within the given time frame of 30th September. This… pic.twitter.com/zdQUDVhOKS
— ANI (@ANI) May 19, 2023
दोन हजारांच्या नोटा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकेत जाऊन बदलून मिळणार आहे. त्यानंतर ही नोट चलनात कायम राहणार आहे. आरबीआयच्या अपेक्षेप्रमाणे नोटा बदलून घेण्यासाठी हा 4 महिन्याचा कालावधी पुरेसा आहे आणि या दरम्यान जवळपास दोन हजार रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबर पर्यंत बँकांमध्ये परत येतील ही अपेक्षा आहे. त्यामुळे लोकांना घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. (Two Thousand Note News)