Teacher Transfer 2023 : राज्यातील शिक्षक बदली संदर्भात शिक्षकांना कार्यमुक्ती करण्यासंदर्भात एक महत्वपूर्ण परिपत्रक काढण्यात आले आहे, यानुसार आता कोर्टात दाखल केलेल्या याचिका संदर्भातील शिक्षक वगळता इतर शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे. सविस्तर पाहूया..
बदली झालेल्या शिक्षकांसाठी सरकराचे आदेश - परिपत्रक
जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या सन 2022 23 मधील जिल्हांतर्गत बदल्या या Teacher Transfer Management System या संगणकीय प्रणालीमार्फत करण्यात येत आहे. त्यानुसार आता ऑनलाईन पध्दतीने करण्याची बदली संदर्भातील कार्यवाही पूर्ण झालेली आहे.
सन 2022 मधील जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील जे न्यायालयीन प्रकरणांमध्ये याचिका कर्त्यांची बदली करण्यात येवू नये किंवा याचिका कर्त्यांच्या बदलीस स्थगिती देण्याबाबत मा. न्यायालयाचे निर्देश आहेत, असे शिक्षकः वगळता इतर शिक्षकांना शासनाने 24 फेब्रुवारी 2023 च्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार कार्यमुक्त करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी असे कळविण्यात आले आहे.
शिक्षक बदली 24 फेब्रुवारी 2023 चे परिपत्रक येथे पहा
4 मे 2023 चे बदली बाबत महत्वाचे परिपत्रक येथे पहा