SSC Result Date 2023 Maharashtra Board : दहावीच्या निकालाबाबत एक महत्वाची अपडेट आली समोर, महाराष्ट्र राज्यातील इयत्ता बारावीचा निकाल 25 मे 2023 रोजी महाराष्ट्र शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे, आता इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल (SSC Result Date) कधी जाहीर होणार ? याबाबत विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता लागली आहे, दहावीचा निकाल 2 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार असून, निकाल कोठे व कसा पहायचा पाहूया..
दहावीचा निकाल कधी लागणार आहे? पहा तारीख
सीबीएससी, आयसीएसई, आयसीएस (CBSE, ICSE, ICS) व इतर राज्यातील शिक्षण मंडळांनी इयत्ता दहावी, बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील बारावी परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थी पालकांमध्ये उत्सुकता होती, शिक्षण मंडळाने 25 मे 2023 रोजी दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल जाहीर केला आहे.
दहावी परीक्षेच्या बोर्डाचा निकाल एका खात्रीशीर मिडिया रिपोर्ट नुसार, Maharashtra State board 10th result बोर्डाचा दहावीचा निकाल 2 जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे.
बोर्डाकडून अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र हा निकाल उद्याच जाहीर केला जाणार असल्याची शक्यता आहे.
महागाई भत्ता तब्बल 8 % वाढ येथे पहा
'आरटीई' लेटेस्ट अपडेट येथे पहा
'या' ठिकाणी पाहता येणार निकाल, डायरेक्ट लिंक
महाराष्ट्र बोर्डच्या mahresult.nic.in आणि mahahsscboard.in. या वेबसाईटवर निकाल चेक करता येणार आहे.
दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.
दहावीचा निकाल SMS द्वारे मोबाईलवर असा चेक करा
Maharashtra HSC Result On SMS : दहावीचा निकाल पाहण्यासाठी एकदम साईट वर लोड आल्यास मोबाईलवर SMS द्वारे पाहता येणार आहे. त्यासाठी खालील स्टेप फॉलो करा
- मोबाईल मधील Messaging App ओपन करा
- तिथे उजव्या बाजूच्या + या आयकॉन वर क्लिक करा
- त्यांनतर कॅपिटलमध्ये MHSSC असे टाईप करा, आणि त्यापुढे तुमचा रोल नंबर टाइप करा.
- हा एसएमएस SMS 57766 या क्रमांकावर पाठवा.
- क्षणात तुमच्या निकालाचा मेसेज तुम्हाला मिळेल.
बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत वेबसाईटवर दुपारी 2 वाजता पाहता येणार आहे.