RTE Admission 2023 : 'आरटीई' अंतर्गत सर्वाधिक प्रवेश निश्चित झालेले टॉप 5 जिल्हे, जिल्हानिहाय आकडेवारी येथे पहा..

RTE Admission 2023 24 : 'आरटीई' प्रवेश प्रक्रिया 2023 24 साठी लॉटरी मध्ये निवड झालेल्या बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्याची अंतिम मुदत  संपली असून, आतापर्यंत राज्यातील 8 हजार 823 शाळांमध्ये 94 हजार 700 बालकांची निवड करण्यात आलेली आहे, त्यापैकी 63 हजार 875 बालकांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हानिहाय आकडेवारी सविस्तर पाहूया..

'आरटीई' 25 टक्के ऑनलाइन प्रवेश 2023 24

RTE Admission Confirmed Admissions

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये राज्यातील आर्थिक व वंचित घटकातील बालकांना 'आरटीई' अंतर्गत खाजगी नामांकित शाळेत मोफत प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्ष 2023 24 करिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

'आरटीई' अंतर्गत सर्वाधिक प्रवेश निश्चित झालेले टॉप 5 जिल्हे 

'आरटीई' 25 टक्के अंतर्गत आतापर्यंत राज्यातील सर्वाधिक प्रवेश हे पुणे जिल्ह्याचे झाले असून टॉप 5 जिल्हे खालीलप्रमाणे

जिल्हा - शाळा - जागा - निवड - प्रवेश निश्चित

  1. पुणे - 935  - 15596 - 15501-10707
  2. ठाणे - 628 - 12263 - 10996 - 7020
  3. नागपूर - 653 - 6577 - 6513 - 4261
  4. नाशिक - 401 - 4854 - 4750 - 3157
  5. रायगड - 264 - 4256 - 3790 - 2636

'आरटीई' प्रवेश जिल्हानिहाय आकडेवारी

'आरटीई' 25 टक्के अंतर्गत राज्यातील बालकांचे प्रवेश निश्चित करण्याचे काम सध्या सुरु आहे. जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे.. 

(सदरची आकडेवारी ही 24 मे रोजीच्या RTE पोर्टलवरील अपडेट आकडेवारी नुसार असून, सध्या तांत्रिक कामकाज सुरु असल्याने यामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घ्यावी.)

RTE Admission Confirmed Admissions



'आरटीई' रिक्त जागांवरील प्रवेशासाठी 'आता' प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी

'आरटीई' लॉटरी निवड यादीतील बालकांचे प्रवेश निश्चित करण्याकरिता शालेय शिक्षण विभागाने  22 मे 2023  ही अंतिम तारीख निश्चित केली होती.सविस्तर येथे वाचा..

सदरची मुदत संपली असून, रिक्त जागांचा आढावा घेण्यासाठी ही तांत्रिक प्रक्रिया पार पडण्यासाठी अजून दोन-तीन दिवस लागणार आहे, त्यानुसार अंतिम रिक्त जागांवरील प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीतील मुलांना अनुक्रमे प्रवेशाची संधी मिळणार आहे.

'आरटीई' 25 टक्के प्रवेशासाची दुसरी फेरी येथे पहा
प्रतीक्षा यादीतील क्रमांक येथे चेक करा

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now