RTE Admission Second Round 2023 : 'आरटीई' प्रवेश प्रक्रिया 2023 24 अंतर्गत लॉटरीमध्ये निवड झालेल्या मुलांच्या प्रवेश निश्चितीसाठी (दि. 22) मे पर्यंत शेवटची मुदत देण्यात आली होती, आता 'आरटीई' प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी मिळणार आहे, याबाबतची महत्वाची अपडेट बातमी सविस्तर पाहूया..
'आरटीई' 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023 24
शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE Act 2009) अंतर्गत राज्यातील आर्थिक व वंचित घटकातील बालकांना 'आरटीई' अंतर्गत खाजगी नामांकित शाळेत मोफत प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्ष 2023 24 करिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
राज्यात RTE अंतर्गत 8 हजार 823 शाळांमधील 1 लाख 1 हजार 846 जागांसाठी 3 लाख 64 हजार 413 अर्ज प्राप्त झाले. त्यानुसार सन 2023 24 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडत (लॉटरी) 5 एप्रिल 2023 रोजी काढण्यात आली आहे.
लॉटरी पद्धतीने काढलेल्या सोडतीनुसार राज्यातील 94 हजार 700 मुलांची RTE प्रवेशासाठी अंतिम Selection List जाहीर करण्यात आली होती, त्यानुसार कागदपत्रे पडताळणी करून अंतिम प्रवेश निश्चित करण्यासाठी दिनांक 22 मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
आतापर्यंत राज्यातील RTE पोर्टल वरील आकडेवारीनुसार 94 हजार 700 विद्यार्थ्यांपैकी 63 हजार 653 बालकांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. व जवळपास 30 हजार जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. जिल्हानिहाय आकडेवारी सविस्तर येथे पहा..
'आरटीई' प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश
'आरटीई' प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्याचे अंतिम मुदत ही 22 मे 2023 पर्यंत होती. 'आरटीई' पोर्टलवर जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सद्यस्थितीत जवळपास 30 हजार जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे या रिक्त राहिलेल्या जागांचा आढावा घेऊन ही संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया पार पाडण्यास अजून दोन ते तीन दिवस लागू शकतील.
त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना RTE प्रवेशाची संधी मिळणार आहे. त्यामध्ये प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना एसएमएस (SMS) पाठविण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती लवकरच आरटीई पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहे.