RTE Admission Online Status 2023 : 'आरटीई' 25 टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये लॉटरी पद्धतीने 94 हजार 400 बालकांची निवड झाली आहे, या बालकांना राज्यातील खाजगी नामांकित शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे, यापैकी आतापर्यंत बालकांचे कागदपत्रे पडताळणी करून RTE Admissions 62 हजार 420 प्रवेश निश्चित (Confirmed) करण्यात आले आहे, तुमच्या मुलाचा प्रवेश निश्चित झाल्या असल्याची खात्री करण्यासाठी आरटीई पोर्टलवर कसे व कोठे चेक करायचे याबद्दलची माहिती सविस्तर पाहूया..
'आरटीई' 25 टक्के प्रवेशासाठी मुदतवाढ
शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE Act) 2009 नुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रीया संपुर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येते.
सन 2023 24 या शैक्षणिक वर्षाच्या बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये अंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या प्रवेशाकरीता 8 मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची स्थिती
RTE अंतर्गत राज्यातील बालकांचे कागदपत्रे पडताळणी सुरु असून, त्यानुसार आतापर्यंत 41 हजार 127 प्रवेश Confirmed करण्यात आले आहे. यामध्ये पुणे , ठाणे व नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक प्रवेश निश्चित झाले आहेत, तर सर्वात कमी जालना, नंदुरबार व सिंधुदुर्ग जिल्हे आहेत.
RTE अंतर्गत तुमच्या मुलाचा प्रवेश Confirmed झाला आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी खालीलप्रमाणे अर्जाची स्थिती तपासा.
RTE Admission Online Status - आरटीई ऑनलाईन प्रवेशाची स्थिती येथे चेक करा
RTE 25 टक्के योजनेंतर्गत तुमच्या मुलाचा जर लॉटरी मध्ये नंबर लागला असेल तर त्यानुसार तुम्ही तालुका/मनपा किंवा प्रत्यक्ष शाळेत जाऊन कागदपत्रे पडताळणी केली असेल, आता त्यानुसार तुमचा प्रवेश निश्चित झाल्याची खात्री करण्यासाठी पुढील स्टेप Follow करा.
Application Wise Details - अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी RTE Official Website वर जा (लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे)
तिथे HOME पेजवर - Application Wise Details - अर्जाची स्थिती असे ऑप्शन शोधा आणि त्यावर क्लिक करा
आता Application No. : मध्ये आपल्या अर्जाचा नंबर टाकून अर्जाची स्थिती चेक करा.
जर तुमचा प्रवेश Confirmed झाला असेल तर Admitted असे दिसेल.