मोठी बातमी ! 'आरटीई' प्रवेशासाठी 22 मेपर्यंत मुदतवाढ, आतापर्यंत 58 हजार 140 प्रवेश निश्चित..

RTE Admission Last Date : महाराष्ट्र राज्यातील 'आरटीई' संदर्भात एक महत्वाची अपडेट अशी आहे की, 'आरटीई' प्रवेशासाठी ऑनलाइनचा अडथळा सातत्याने येत असून, यादरम्यान पालकांची धावपळ होत आहे, RTE ऑनलाइन प्रवेशासाठी आता 22 मे 2023 पर्यंत (RTE Admission Last Date) मुदतवाढ देण्यात आली आहे, आता पर्यंत राज्यातील 94 हजार 700 विद्यार्थ्यांपैकी फक्त 58 हजार 140 प्रवेश निश्चित झाले आहे. 

'आरटीई' 25 टक्के ऑनलाइन प्रवेश 2023 24

RTE Admission Last Date

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये राज्यातील आर्थिक व वंचित घटकातील बालकांना 'आरटीई' अंतर्गत खाजगी नामांकित शाळेत मोफत प्रवेश दिला जातो.

शैक्षणिक वर्ष 2023 24 मधील प्रवेश प्रक्रिया यंदा लवकरच सुरू करण्यात आली असून, त्यानुसार फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात आले, त्यानंतर 5 एप्रिल 2023 रोजी RTE निकाल लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. 'आरटीई' निकाल 2023 यादी येथे पहा

लॉटरी पद्धतीने काढलेल्या सोडतीनुसार राज्यातील 94 हजार 700 मुलांची RTE प्रवेशासाठी अंतिम Selection List जाहीर करण्यात आली आहर. निवड झालेल्या पालकांना 12 एप्रिल रोजी मोबाईल क्रमांकावर SMS पाठवण्यात आले आहे. तसेच RTE Login मध्ये Admit Card प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.

RTE प्रवेशाच्या Waiting List मध्ये 81 हजार 129 बालकांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर RTE Waiting मधील पालकांना SMS पाठवण्यात येणार आहे. सध्या लॉटरी मध्ये निवड झालेल्या बालकांच्या कागदपत्रे पडताळणी सुरु आहे.

'आरटीई' ऑनलाइन प्रवेशासाठी मुदतवाढ

'आरटीई' प्रवेशासाठी ऑनलाइनचा अडथळा सातत्याने येत आहे. त्यामुळे पालकांची धावपळ होताना दिसत आहे.  आतापर्यंत 94 हजार 700 विद्यार्थ्यांपैकी 58 हजार 140 प्रवेश ऑनलाईन निश्चित झाले आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार येत असल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे, तरी याबाबत पालकांनी कोणतीही भीती /संभ्रम बाळगू नये. तसेच ज्या बालकांची प्रवेशासाठी सोडत ( लॉटरी )द्वारे निवड झाली आहे अशा बालकांना शाळा प्रवेशाकरिता पुरेसा कालावधी देण्यात येईल. अशी माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. 

RTE लॉटरी यादीतील बालकांचे प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 25 एप्रिल 2023 पर्यंत देण्यात आली होती, मात्र आता RTE अंतर्गत प्रवेश घेण्याची मुदत ही 22 मे 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. (RTE Admission Last Date 22 MAY 2023)

आरटीई ऑनलाईन प्रवेशाची स्थिती येथे चेक करा

संबंधित बातम्या 

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now