RTE 25 % Admission 2023 : राज्यातील 'आरटीई' २५ टक्के प्रवेश संदर्भात रिक्त असलेल्या जागा भरण्याची हालचाल सुरु झाली आहे, RTE अंतर्गत लॉटरी मध्ये निवड झालेल्या मुलांचे आतापर्यंत ६४ हजार २५६ प्रवेश निश्चित झाले असून, अजूनही ३० हजार ४४४ जागा रिक्त राहिलेल्या आहेत, आता या जागांसाठी प्रतीक्षा यादीतील मुलांना अनुक्रमे प्रवेश घेण्याची संधी दिली जाणार आहे, सविस्तर पाहूया..
'आरटीई' अंतर्गत ८१ हजार १२९ बालके प्रतीक्षा यादीत
'आरटीई' २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०२३ २४ अंतर्गत आतापर्यंत राज्यातील RTE अंतर्गत ६४ हजार २५६ मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर RTE कोट्यातील अजून ३० हजार ४४४ जागा ह्या रिक्त आहेत.
या रिक्त असलेल्या जागांवर आता प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेश घेण्याची संधी दिली जाणार आहे. ५ एप्रिल २०२३ रोजी ऑनलाईन सोडत लॉटरी लागलेली असून, त्यावेळी प्रतीक्षा यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.
'आरटीई' लॉटरी प्रतीक्षा यादीत ८१ हजार १२९ बालके असून, हे विद्यार्थी आता रिक्त असलेल्या जागांसाठी प्रतीक्षेत आहे. मात्र यातील फक्त रिक्त जागानुसारच म्हणजे ३० हजार ४४४ मुलांना SMS पाठवण्यात येणार आहे. प्रवेश घेण्याची अंतिम मुदत २२ ,मे रोजी संपली असून, आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील असे शासनाने जाहीर केले आहे.
रिक्त असलेल्या जागांवर प्रवेश घेण्याची संधी
'आरटीई' अंतर्गत रिक्त असलेल्या जागांवर आता प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी दिली जाणार आहे. यासंदर्भात तांत्रिक प्रक्रिया पार पाडण्याचे काम सुरू असून, ३१ मे २०२३ च्या आसपास प्रतीक्षा यादीतील मुलांच्या पालकांना एसएमएस पाठवले जाणार असून, मुलांना प्रवेशाची संधी मिळणारआहे. त्यानंतर या मुलांचे कागदपत्रे पडताळणी करून सदर प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे. [प्रतीक्षा यादीतील प्रवेश कधी सुरु होणार येथे पहा]