RTE Admission 2023 : 'आरटीई' २५ टक्के अंतर्गत प्रतीक्षा यादीतील २५ हजार ८९० मुलांची निवड, ३० मे पासून प्रवेश घेण्यास सुरुवात..

RTE Admission 2023 : राज्यातील 'आरटीई' २५ टक्के प्रवेश संदर्भात महत्वाची अपडेट, निवड यादीतील प्रवेश पूर्ण झाली असून आता प्रतीक्षा यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया ३० मे २०२३ पासून सुरु करण्यात आली आहे असून प्रवेश घेण्याची अंतिम मुदत  12 जून 2023 पर्यंत असणार आहे. सविस्तर बातमी पाहूया.

'आरटीई' २५ टक्के निवड यादीतील ६४ हजार २५६ मुलांचे प्रवेश निश्चित

rte admission second round

'आरटीई' २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०२३ २४ अंतर्गत राज्यातील निवड यादीतील ६४ हजार २५६ मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. निवड यादीतील मुलांना प्रवेश घेण्याची अंतिम मुदत २२ मे पर्यंत देण्यात आली होती. आता प्रतीक्षा यादीतील मुलांचे प्रवेश ३० मे पासून सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातील २५ हजार ८९० मुलांना प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे.

'आरटीई' लॉटरी प्रतीक्षा यादीतील ८१ हजार १२९ मुलांपैकी अनुक्रमे २५ हजार ८९० मुलांना एसएमएस पाठविण्यात आले असून, ३० मे २०२३ पासून प्रवेश घेण्यास सुरुवात झालेली आहे.

'आरटीई' २५ टक्के अंतर्गत प्रतीक्षा यादीतील २५ हजार ८९० मुलांची निवड

'आरटीई' २५ टक्के प्रवेश करिता प्रतीक्षा यादीतील राज्यातील 25 हजार 890 मुलांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, मुंबई आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक मुलांना प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे.

कागदपत्रे पडताळणी अंतिम मुदत

प्रतीक्षा यादीतील 25 हजार 890 मुलांची निवड करण्यात आली असून, आता या मुलांना प्रवेश घेण्यासाठी 30 मे 2023 पासून संधी देण्यात आलेली आहे, या तारखेपासून कागदपत्रांची पडताळणी समिती (तालुका/मनपा) येथे करून प्रवेश निश्चित करून घेण्यात यावा, तसेच प्रवेश घेण्याची अंतिम मुदत ही 12 जून 2023 पर्यंत देण्यात आली आहे.

'आरटीई' प्रतीक्षा यादीतील मुलांचे प्रवेशपत्र उपलब्ध येथे डाउनलोड करा
जिल्हानिहाय रिक्त जागा येथे पहा

पुढील अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now