Old Pension Scheme : 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेतील बहुतांश लाभ लागू, शासन निर्णय जारी येथे पहा..

Old Pension Scheme News : राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता जुन्या निवृत्तिवेतन योजनेतील कुटुंब निवृत्तिवेतन, रुग्णता निवृत्तिवेतन, मृत्यु उपदान, सेवानिवृत्ती उपदान इत्यादी लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सविस्तर बातमी पाहूया..

जुनी पेन्शन योजनेतील बहुतांश लाभ कर्मचाऱ्यांना लागू

Old Pension Scheme News 2023

केंद्र शासनाच्या Central Civil Services (Implementation of National Pension System) Rules, 2021 नुसार केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (National Pension System) अंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू केले आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू

केंद्र शासनाच्या या निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेतील परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना व राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचान्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्यात आले आहे.

1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना 'हे' लाभ मिळणार

शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की, दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचा
सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान
रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्याना रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. Old Pension Scheme News

त्यानुसार सदर कुटुंब निवृत्तिवेतन धारकास व रुग्णता निवृत्तिवेतन धारकास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतन / रुग्णता निवृत्तिवेतन लागू होणार आहे.

सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना महागाई भत्ता वाढीचा निर्णय येथे पहा

दिनांक 1 नोव्हेंबर 2005 ते 31 मार्च 2023 निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यू उपदान, कुटुंब निवृत्तिवेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबतचा नमुना-3 मधील विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा लागणार आहे. 

त्यानुसार कुटुंब निवृत्तिवेतनधारकास त्याला मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम व परिभाषित निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज / लाभांशासह रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्तिवेतनाचा लाभ अनुज्ञेय होईल. सदर रक्कम समायोजित झाल्यानंतर कुटुंब निवृत्तिवेतनधारकास नियमितपणे कुटुंब निवृत्तिवेतन अनुज्ञेय राहील..

विकल्प नमुना फॉर्म

  • नमुना 1 - कुटुंबाचा तपशील
  • नमुना 2 - सेवेत असताना शासकीय कर्मचारी विकलांगतेमुळे शासकीय सेवेकरिता असमर्थ ठरल्यास / मृत्यू पावल्यास त्याला अनुज्ञेय लाभ मिळण्याबाबतचा विकल्प नमुना 2 मध्ये भरणे आवश्यक आहे.
  • नमुना- 3 - परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना दि.1 नोव्हेंबर 2005 ते 31 मार्च 2023 पर्यंतच्या कालावधीत रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी / मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी द्यावयाचा विकल्प नमुना- 3 मध्ये भरणे आवश्यक आहे. (Old Pension Scheme News)
  • नमुना - 4 - जे शासकीय कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ प्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतन किंवा रुग्णता निवृत्तिवेतन अनुज्ञेय कर
    ण्याबाबतचा विकल्प सादर करतील, त्यांनी नमुना - 4 प्रमाणे कुटुंबाचा तपशील सादर करणे अनिवार्य आहे.
  • सर्व नमुने फॉर्म व शासन निर्णय येथे डाउनलोड करा
महत्वपूर्ण बातम्या

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now