NEET UG Admit Card 2023 : NEET UG परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता NEET UG Admit Card प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे, NEET UG परीक्षा 7 मे 2023 रोजी दुपारी 2 ते 5.20 या वेळेत परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
NEET UG Admit Card 2023 उपलब्ध
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) च्या अधिकृत वेबसाईटवर नीट युजी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. यंदा NEET UG परीक्षेसाठी देशभरातून जवळपास 18 लाख 72 हजार 341 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केला आहे.
NEET UG परीक्षा देशभरातील 499 शहरातील विविध केंद्रावर तसेच देशाबाहेरील 14 शहरामध्ये एकाच दिवशी म्हणजे 7 मे 2023 रोजी दुपारी 2 ते 5.20 यावेळेत होणार आहे.
NEET UG Admit Card 2023 : असे करा डाऊनलोड
NEET UG Admit Card 2023 डाउनलोड करण्यासाठी पुढीलप्रमाणे स्टेप Follow करा
Step 1 - सर्वप्रथम NEET (NTA) च्या अधिकृत वेबसाइट https://neet.nta.nic.in/ वर जा.
Step 2 - त्यानंतर Candidate Activity या ऑप्शन मधील Download Admit Card वर क्लिक करा
Step 3 - आता एक नवीन पेज ओपन होईल तिथे Login Through Application Number & Date of Birth टाकून लॉगीन करा
Step 4 - त्यामध्ये Application No, Date of Birth, Enter Security Pin, Security Pin टाकून सबमिट करा
Step 5 - तुमचे NEET UG Admit Card (प्रवेशपत्र) स्क्रीनवर दिसेल.
Step 6 - प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून घ्या.