MHADA Lottery : अखेर ! म्हाडा लॉटरीची ऑनलाईन सोडत जाहीर, निकाल व संपूर्ण LIVE कार्यक्रम येथे पहा..

MHADA Lottery Result 2023 : घर घेण्याचे स्वप्न असणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी, अखेर म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी दिनांक 10 मे 2023 रोजी जाहीर करण्यात आली आहे, या ऑनलाईन सोडतीचे उद्घाटन मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले, या लॉटरी मध्ये 4 हजार 640 सदनिकांची व 14 भूखंडाची लॉटरी संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन काढण्यात आली आहे. सविस्तर बातमी पाहुया..

कोकण मंडळ म्हाडा लॉटरीची ऑनलाईन सोडत जाहीर

MHADA  Lottery Result 2023

म्हाडाच्या कोकण मंडळाची 4 हजार 640 सदनिकांची आणि 14 भूखंडांची संगणकीय लॉटरी काढण्यात आली. या सोडतीचा शुभारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. (MHADA Lottery Result 2023)

सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नांना बळ आणि आकार देण्याची जबाबदारी म्हाडा चांगल्या रितीने पेलत आहे. अनेक कुटुंबांचे गृहस्वप्न पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मला मिळाली याचा आनंद आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

लॉटरी मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरांचा ताबा द्या - मुख्यमंत्री

याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, घर म्हणजे म्हाडा हे नाते सामान्यांच्या मनात घट्ट झाले आहे. म्हाडाची गरजूंना घरे देण्याची कार्यप्रणाली कौतुकास्पद आहे. 

सोडतीला मिळालेला प्रतिसाद पाहिला तर म्हाडावरील विश्वास सिद्ध होतो. आजच्या सोडतीत घर मिळालेल्या लाभार्थ्यांना म्हाडाने लवकरात लवकर घरांचा ताबा द्यावा. जेणेकरून त्यांचा गृहप्रवेश लवकर होऊ शकेल. (MHADA Lottery Result 2023) 

शासनाकडून अडीच लाखाची मदत मिळणार

यावेळी बोलताना मुख्यमंत्री यांनी आपण लवकरच पंतप्रधान आवास योजनेत अत्यल्प उत्पन्न गटासाठी खोणी, शिरढोण, विरार बोळींज, गोठेघर येथे सदनिका देणार आहोत. त्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाली आहे. केंद्राचे 1.50 लाख आणि राज्य शासनाचे 1 लाख अनुदान त्यासाठी मिळणार आहे. या माध्यमांतून अनेकांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.

प्रत्येकाला घर मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील

यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येकाला घर या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे, याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. 

येत्या काळात प्रधानमंत्री आवास योजना आणि म्हाडाच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेघरांना मिळवून देण्याचे काम महाराष्ट्र शासनाकडून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात रिमोटद्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडतीचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. डिग्गीकर यांनी केले तर आमदार श्री. कथोरे यांनी मनोगत व्यक्त केले. (MHADA Lottery Result 2023)

या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, किरण सरनाईक, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंग, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, कोकण म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मारोती पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

म्हाडा लॉटरीचा निकाल येथे पहा

कोकण मंडळाच्या लॉटरीचा निकाल जाहीर झाला असून, निकाल पाहण्यासाठी MHADA च्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि तिथे Search Draw Result या पर्यायावर क्लिक करून तुमचा Application No टाका आणि MHADA Lottery Result 2023 चेक करा.

म्हाडा लॉटरीचा निकाल येथे पहा

म्हाडा लॉटरीचा संपूर्ण LIVE कार्यक्रम येथे पहा

म्हाडा लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात आला असून, संपूर्ण LIVE कार्यक्रम पहा.


महत्वाच्या बातम्या

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now