Kotwal Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी, कोतवाल पद भरतीच्या 80 टक्के जागा भरण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून, इयत्ता चौथी पास उत्तीर्ण उमेदवार कोतवाल या पदासाठी अर्ज करू शकतात, संपूर्ण राज्यातील कोतवाल पदाची (Kotwal Bharti 2023) रिक्त पदे 15 ऑगस्ट 2023 पूर्वी भरण्याबाबत शासनाने कळविले आहे, त्यानुसार आता राज्यभरात कोतवाल पदाच्या भरतीला सुरुवात झाली असून कोतवाल पद भरतीची सविस्तर बातमी पाहूया..
राज्यातील कोतवाल पदाच्या 80 टक्के जागा भरण्यास शासनाची मान्यता
राज्यातील कोतवाल हे पद महसूल विभागाअंतर्गत येते राज्यभरातील कोतवाल संवर्गातील रिक्त असलेल्या पदांपैकी 80 टक्के रिक्त जागा या भरण्यास शासनाने विशेष भाग म्हणून मान्यता दिली आहे.
कोतवाल पदाची भरती प्रक्रिया (Kotwal Bharti 2023) ही जिल्हा निवड मंडळातर्फे जिल्हाधिकारी यांचा नियंत्रणाखाली त्वरित करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केली आहे.
17 मे च्या शासन निर्णयातील सुधारित तरदुतीनुसार कोतवाल पदभरती
राज्यातील कोतवाल पदाची भरती महसूल व वन विभागाच्या 17 मे 2023 च्या शासन निर्णयातील सुधारित तरतुदीचे काटेकोरपणे पालन करून कोतवाल पदाची पद भरती केली जाणार आहे. तसेच सदरची पद भरती प्रक्रिया आहे 15 ऑगस्ट 2023 पूर्वी कोणत्याही परिस्थितीमध्ये पार पाडण्यासंदर्भात जिल्ह्यांना कळविण्यात आले आहे.
- 17 मे 2023 च्या शासन निर्णयानुसार कोतवाल संवर्गाची पदे भरताना 100 गुणांची लेखी परीक्षा व लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे 50 प्रश्न असणार आहे.
- लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी तयार करून उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे.
- तसेच नामनिर्देशनाद्वारे पद भरती करताना बिंदूनामावलीची अंमलबजावणी संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णयातील तरतुदींची अंमलबजावणी व आरक्षण कायद्यातील तरतुदींचे पालन करण्यासंदर्भात शासनाने कळविले आहे.
4 थी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी
राज्यातील कोतवाल हे गाव पातळीवरील तलाठ्याच्या सहकार्याने विविध कामे करत असतो. हे पद महसूल विभागांच्या अंतर्गत भरण्यात येते. राज्यातील इयत्ता 4 थी पास असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात (सातवी, दहावी, बारावी व पदवीधारक देखील अर्ज भरू शकतात.)
आवश्यक पात्रता
- शैक्षणिक - किमान 4 थी उत्तीर्ण
- वय - 18 ते 40 वर्ष
- राखीव जागांसाठी संबंधित कागदपत्रे
- चारित्र्याचा दाखला
कोतवालांच्या मानधनात 7 हजार 500 रुपयांची वाढ
महसूल विभागामार्फत गाव पातळीवर राज्यात 1959 पासून कोतवाल हे पद अस्तित्वात आहे. कोतवाल हे तलाठ्याच्या सहकार्याने गाव पातळीवर विविध कामे करत असतो. कोतवालांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शासनाने 17 मार्च 2023 च्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला आहे. कोतवालाच्या मानधनात 7 हजार 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता कोतवालांना एवढे मानधन मिळणार आहे. सविस्तर येथे पहा.