सरकार भरणार २० लाखापर्यंतच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज
इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाकडून इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बँकेमार्फत मंजूर केलेल्या 20 लक्ष रूपयापर्यंत कर्जाच्या रकमेवरील व्याज परतावा वितरीत केली जाते.
शैक्षणिक कर्ज योजनेतंर्गत येणारे अभ्यासक्रम
१) मेडिकल अभ्यासक्रम (Medical Courses) – MBBS, BDS, BAMS, BHMS, B.Pharm, व संबधीत विषयांतील सर्व पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम.
३) व्यावसायिक अभ्यासक्रम (Professional Courses) – LLB , हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन टेक्नोलॉजी, इंटेरिअर डिझाईन पदवी, बॅचलर ऑफ डिझाईन, फिल्म व टेलीव्हिजन अभ्यासक्रम, पायलट, सनदी लेखापाल, MBA,MCA SHIPPING, विषयांतील पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम.
देशांतर्गत अभ्यासक्रम
केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद,शासकीय अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त (NACC ) अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले व प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता आहे. यात आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन, कृषी अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान या अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
परदेशी अभ्यासक्रम
आरोग्य विज्ञान, विज्ञान, कला, अभियांत्रिकी, व्यावसायिक अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट अभ्यासक्रम.
शैक्षणिक कर्ज घ्या, व्याजाचा परतावा शासन करेल
तुम्ही जर इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी असाल. तुम्हाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जावयाचे असेल किंवा राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल तर तुम्ही शैक्षणिक कर्ज घेऊ शकता.
तुमच्या कर्जावरील व्याजाची रक्कम भरण्याची व्यवस्था शासन करणार आहे. ‘व्याज कसे द्यायचे’ या चिंतेतून तुमची मुक्ती होऊ शकते. त्यासाठी आपण इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या संकेतस्थळाला भेट दयावी.
शैक्षणिक कर्ज (Education Loan Interest) व्याज परतावा योजनेसाठी अर्ज ऑनलाईन करावयाचा असून कर्जाच्या व्याजाचा परतावा महामंडळातर्फे दिला जातो. या योजनेचा आपण अवश्य लाभ घ्यावा. [राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढ येथे पहा]
योजनेसाठी लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती
- अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे.
- अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील असावा.
- महाराष्ट्राचा रहीवासी असणे आवश्यक.
- अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरीता 8 लाखांपर्यंत असावी.
- अर्जदार हा इयत्ता बारावी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा.
- तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदवीका (Diploma) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 पेक्षा अधिक असावा.
कर्ज प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे
- अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला.
- तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला.
- तहसीलदार यांचा महाराष्ट्र रहिवासी (वय अधिवास) दाखला.
- अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे आधार कार्ड
- ज्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमाची पात्रता परिक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका.
- अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट फोटो
- अर्जदाराचा जन्माचा व वयाचा पुरावा
- शैक्षणिक शुल्क संबधित पत्र.
- शिष्यवृत्ती (Scholarship) , शैक्षणिक शुल्कमाफी (Freeship), पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र
- मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा.
- आधार संलग्न बँक खाते पुरावा.
- तसेच इतर आवश्यक कागदपत्रे व पुरावे.
'व्याज' परतावा व परतफेडीचा कालावधी
शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदाराने बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची नियमीत परतफेड केलेल्या हप्त्यामधील नियमित असलेल्या व्याज (Interest) रकमेचा परतावा (कमाल 12 टक्के पर्यंत) महामंडळ अदा करेल. तसेच व्याज परतावासाठी जास्तीत जास्त 5 वर्षे कालावधी ग्राह्य धरण्यात येईल.
कार्यपद्धती – सदर योजना पूर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपले अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर जावून भरावयाचे आहेत.
अधिक माहितीसाठी इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,आय टी आय समोर, राहाटे कॉलोनी, नागपूर - 440022 या जिल्हा कार्यालयाच्या पत्यावर अथवा महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळाला किंवा ई मेल – dmobcamaravati@gmail.com वर भेट द्यावी. संपर्कासाठी दुरध्वनी क्रमांक – 0712-2956086 असा आहे. [35 हजार रुपयाची शिष्यवृत्ती 'येथे' करा ऑनलाईन अर्ज येथे करा]