DA Increase News : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महाराष्ट्र राज्यातील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्यात 4% टक्के वाढ करण्यात आली आहे, दिनांक 29 मे 2023 रोजी काढलेल्या आदेशान्वये आता 42% प्रमाणे महागाई भत्ता देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, राज्यातील कोणत्या अधिकारी कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता लागू झाला आहे, सविस्तर पाहूया..
केंद्राप्रमाणे महागाई भत्ता मिळणार
केंद्र सरकार व इतर राज्य सरकारने सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या व निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय सातत्याने घेतला जात आहे. (Dearness Allowance)
नुकताच गुजरात राज्य सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले असून, या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 8% वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. [महागाई भत्ता 8% वाढीची सविस्तर बातमी येथे पहा]
केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या 6 एप्रिल 2023 च्या ज्ञापनानुसार आता महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना 4% महागाई भत्त्यातील (Dearness Relief) दरवाढ व ज्ञापनात नमूद केलेल्या इतर तरतूदी लागू करण्याचा महत्वपर्ण निर्णय घेण्यात आला आहे. [सेवानिवृत्ती वय 58 वरून 60 वर्ष येथे पहा]
हा महत्वपूर्ण निर्णय राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना 1 जानेवारी 2023 पासून 42% प्रमाणे महागाई भत्ता अनुदेय करण्यात आला आहे.(शासन निर्णय येथे पहा)
महागाई भत्ता वाढीचा निर्णय जाहीर होत असताना आता महाराष्ट्र राज्यातील इतर सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या महागाई भत्यात लवकरच वाढ होण्याचा निर्णय जाहीर होणार आहे.