7th Pay Commission DA Hike News 2023 : केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढीचा (DA Increase) निर्णय घेतल्यानंतर, इतर राज्याने देखील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Government Employees) महागाई भत्ता मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 7th Pay Commission सातवा वेतन आयोगानुसार ही वाढ करण्यात आली आहे. या वर्षात कोणत्या राज्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये वाढ केली? राज्यांची यादी DA Hike News 2023 याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया.
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ
केंद्र सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 38 टक्क्यावरून 42 टक्क्यापर्यंत वाढ केली आहे. ज्याचा लाभ 47.58 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 69.76 लाख पेन्शनधारकांना (Pensioners) मिळाला आहे. ही वाढ 1 जानेवारी 2023 पासून मिळणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'डीए' मध्ये भरघोस वाढ, राज्यांची यादी
हिमाचल प्रदेश राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्यात 3 टक्के वाढ
हिमाचल प्रदेश राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ (DA Increase) करण्यात आली आहे. आता हिमाचल प्रदेश राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34 टक्के DA मिळेल, जो यापूर्वी 31 टक्के होता.
केंद्र सरकार आणि काही राज्यातील सरकाराने 7th Pay Commission नुसार DA मध्ये वाढ केल्यानंतर हिमाचल प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे 2.15 लाख कर्मचारी आणि 1.90 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.
झारखंड राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ
झारखंड राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यातील कर्मचाऱ्यांना 38 टक्के प्रमाणे DA मिळत होता, तो आता 42 टक्के प्रमाणे मिळणार आहे.
या निर्णयाचा राज्यातील जवळपास 1 लाख 93 हजार कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल. तर हा निर्णय 1 जानेवारी 2023 पासून लागू असणार आहे.
हरियाणा राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 42 टक्के
हरियाणा राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA Increase) 4% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारच्या वित्त विभागाच्या आदेशानुसार, मूळ वेतनावरील डीए सध्याच्या 38 टक्क्या वरून 42 टक्के करण्यात आला आहे. हा निर्णय 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे. तर जानेवारी ते मार्च 2023 ची थकबाकी मे महिन्यात दिली जाईल.
महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता कधी वाढणार येथे पहा