Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, राज्यभरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जवळपास 20 हजार 601 पदे भरण्यात येत आहे, यासंदर्भातील सविस्तर बातमी पाहूया..
अंगणवाडी अंतर्गत 20 हजार 601 पदांची मेगा भरती
महाराष्ट्र राज्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत शासनाच्या 7 फेब्रुवारी 2023 च्या परिपत्रकानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जवळपास 20 हजार 601 पदे रिक्त असून, त्यासाठी अंगणवाडी भरती सुरु झालेली आहे, यामध्ये पुढीलप्रमाणे जागा भरण्यात येणार आहे. (Anganwadi Bharti 2023)
- अंगणवाडी सेविका - 4 हजार 509
- मिनी अंगणवाडी सेविका - 623
- मदतनीस - 15 हजार 466
- एकूण - 20 हजार 601
अंगणवाडी भरती आवश्यक शैक्षणिक पात्रता
वयोमर्यादा
अंगणवाडी भरती साठी आवश्यक वयोमर्यादा ही 18 ते 35 वर्ष आहे. (विधवा उमेदवारांसाठी 40 वर्ष)
अंगणवाडी भरती निवड प्रक्रिया
अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका (किमान अर्हता 12 वी उत्तीर्ण)
शैक्षणिक अहर्ता यासाठी एकूण 75 गुण आहेत. तर अतिरिक्त 25 गुण असे एकूण 100 गुणांच्या आधारावर अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मतदनीस या पदासाठी पात्र अर्जानुसार गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते.
अंगणवाडी भरती प्रक्रियेसाठी महिला व बाल विकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास या (ICDS) या विभागाकडून अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज मागविण्यात येतात.
अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका (किमान अर्हता 12 वी उत्तीर्ण) Anganwadi Bharti 2023
या पदांची निवड प्रक्रियेसाठी एकूण 100 गुणानुसार निवड यादी जाहीर करण्यात येते. शैक्षणिक अहर्ता यासाठी एकूण 75 गुण आहेत. तर अतिरिक्त 25 गुण असे एकूण 100 गुणांच्या आधारावर अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मतदनीस या पदासाठी पात्र अर्जानुसार गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते.
अधिकृत वेबसाईट - https://womenchild.maharashtra.gov.in/
अंगणवाडी निवड प्रक्रियेसाठी गुणांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
भरती ची माहिती कोठे मिळेल :- महिला व बाल विकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास या (ICDS) कार्यालयात याबाबत सविस्तर माहिती घ्यावी.