7th Pay Commission Salary Arrears : सातव्या वेतन आयोगा संदर्भात एक महत्वाची बातमी आहे, 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मे अखेरपर्यंत पर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार 7th Pay Commission Salary Arrears फरकाची रक्कम तात्काळ अदा करण्याचे निर्देश पुणे जिल्ह्याचे मा. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी महानगरपालिकेला दिले आहेत, काय आहे बातमी सविस्तर पाहूया..
सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मे अखेरपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम मिळणार
सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मे अखेरपर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम अदा करा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे महानगरपालिकेला निर्देश
पुणे महापालिकेतील 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या सेवक, प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार कार्यवाही करुन फरकाची रक्कम मे अखेर अदा करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. (7th Pay Commission Salary Arrears)
शासकीय विश्रामगृह येथे पुणे मनपा सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पुणे मनपा प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मिनाक्षी राऊत, तसेच महानगरपालिका सेवानिवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष संभाजी भोसले यांच्यासह निवृत्त सेवक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पुणे महापालिकेअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागातील एकूण 2 हजार 553 सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असून तर सन 2016 पूर्वी शिक्षक व शिक्षकेतर सेवानिवृत्त झालेले कर्मचारी 1 हजार 943 आहेत. 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या पुणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्याबाबत एकूण 350 सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विवरणपत्रे तयार केलेली आहेत. त्याअनुषंगाने तांत्रिक अडचणी, वेतन निश्चितीतील त्रुटी पूर्तता करण्याचे काम सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यावर सर्व अडचणी मेअखेरपर्यंत दूर करुन निवृत्तीवेतन योजना लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी दिल्या.
त्याप्रमाणे 2016 पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सर्व लाभ देण्यात आले आहेत, अशीही माहिती मनपाच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली. सदरचे कामदेखील तातडीने पूर्ण करुन हे अखेरपर्यंत 7 वा वेतन आयोगानुसार वाढीव निवृत्तीवेतन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावी. तसेच दोन महिन्यांनंतर सेवा उपदानाची रक्कम देखील अदा करावी, अशा सुचना पालकमंत्री पाटील यांनी यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या.
पालकमंत्र्यांच्या या निर्णयाचे सर्व प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाकडील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.