7th Pay commission : अबब! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात तब्बल 8% टक्क्यांची केली वाढ, 'या' राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय..

7th Pay Commission DA Hike News : राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय, सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या महागाई भत्यात (DA Hike) मध्ये 4 नाही तर तब्बल 8 टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन, सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना मोठे गिफ्ट दिले आहे, सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) महागाई भत्त्यात केलेल्या 8 टक्के प्रमाणे महागाई भत्ता थकबाकी जून महिन्याच्या पगारात मिळणार असून, हा निर्णय 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आला आहे, काय आहे सविस्तर बातमी पाहूया..

सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्त्यात तब्बल 8 टक्क्यांनी वाढ

7th Pay Commission DA Hike

सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या महागाई भत्ता तब्बल 8 % टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय गुजरात राज्य सरकारने घेतला आहे. गुजरात राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री भूपेंद्र पटेल यांनी केंद्र सरकारच्या नियमानुसार राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकाच्या महागाई भत्त्यात सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission DA Hike) 8 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

यामध्ये 4% टक्के DA वाढ ही एक जुलै 2023 पासून मिळणार आहे, तर उर्वरित 4% टक्के DA वाढ ही एक जानेवारी 2023 पासून देण्याचा निर्णय घेतला आहे. अशी एकूण 8 टक्के वाढ करण्यात आली आहे. [सेवानिवृत्ती वय 58 वरून 60 वर्ष येथे पहा]

9 लाख 38 हजार कर्मचारी आणि पेन्शन धारकांना मिळाला लाभ

मुख्यमंत्री माननीय श्री भूपेंद्र पटेल यांनी गुजरात राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी घेतलेल्या या निर्णयाचा राज्यातील 9 लाख 38 हजार कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. (Government Employees And Pensioners)

सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणाऱ्या कर्मचारी आणि पेन्शन धारकांचा यामध्ये समावेश असून, हा निर्णय 4 टक्के महागाई भत्ता 1 जुलै 2022 पासून तर, 1 जानेवारी 2023 पासून 4 टक्के असे एकूण 8% टक्के वाढीचा निर्णय राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लागू करण्यात आला आहे. [अन्य राज्यातील महागाई भत्ता भरघोस वाढ येथे पहा]

महागाई भत्ता वाढ थकबाकी 'तीन' टप्प्यात मिळणार

सरकारने हे देखील जाहीर केले आहे की, 1 जुलै 2023 आणि 1 जानेवारी 2023 पासून वाढवलेल्या 4-4 टक्के प्रमाणात महागाई भत्ता वाढीची थकबाकी ही, तीन टप्प्यात देण्यात येणार असून, पहिला टप्पा हा जून 2023 च्या पगारासोबत देण्यात येईल तर दुसरा टप्पा ऑगस्ट 2023 आणि तिसरा ऑक्टोबर 2023 च्या वेतनासोबत देण्याबाबत सरकारने स्पष्ट केले आहे. [महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाची थकबाकी संदर्भात महत्वाचा निर्णय येथे पहा]

महागाई भत्ता 8% करण्याच्या निर्णयामुळे राज्य सरकारवर दरवर्षी जवळपास 4 हजार 516 करोड रुपयाचा आर्थिक भार पडणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय गुजरात राज्य सरकारने घेतला असता, आता महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता राज्य सरकार वाढ कधी करणार ? याबाबत उत्सुकता लागली आहे.

पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 



Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now