7th Pay Commission Arrears Payment Order : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, 7 वा वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम वितरीत करण्याबाबत शासनाने आदेश निर्गमित केले आहे, त्यानुसार आता जून महिन्याच्या पगारासोबत तिसऱ्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे.
7 व्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता मिळणार
9 मे 2023 रोजी काढलेल्या आदेशानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी सन 2019 20 पासून पुढील 5 वर्षात 5 समान हप्त्यामध्ये देण्यात येत आहे.
वित्त विभागाच्या 9 मे 2022 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै 2021 रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम देण्याबाबत मान्यता दिलेली आहे. 7th Pay Commission Arrears
त्यानुसार आता नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी काढलेल्या 7th Pay Commission Arrears Payment Order आदेशान्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषदा, नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्यांची रक्कम वितरित करण्यात आली आहे.
ज्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी मध्ये खाते आहे, त्यांच्या खात्यामध्ये सदर रक्कम जमा होणार आहे. तर ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू आहे. त्यांना 7 व्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम रोखीने वितरीत करण्यात येणार आहे. ही थकबाकी प्रत्यक्ष जून महिन्याच्या पगारासोबत म्हणजेच जुलै 2023 मध्ये मिळणार आहे.