Zilla Parishad Recruitment : महाराष्ट्रात 75 हजार पदांची मेगा भरती, जिल्हा परिषद अंतर्गत 18 हजार 939 पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरु..

Zilla Parishad Recruitment 2023 : राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट अशी आहे की, जिल्हा परिषद अंतर्गत 18 हजार 939 पदांसाठी मेगा भरती जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे, मात्र तत्पूर्वी या परीक्षेचा अभ्यासक्रम व काठीण्य पातळी निश्चित करण्यासाठी सरकारने तज्ञ समितीची 28 एप्रिल व 29 एप्रिल 2023 रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत (Zilla Parishad Recruitment) पदभरती मधील विविध संवर्गातील पदांचा अभ्यासक्रम व प्रश्न पत्रिकेचे स्वरूप ठरवण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत 18 हजार 939 पदांसाठी मेगा भरती

Zilla Parishad Recruitment

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विविध सरकारी विभागामध्ये सुमारे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा सरकारने निर्धार केला असून, ही पदे  15 ऑगस्ट 2023 पूर्वी भरण्यात येणार आहे. यांतर्गत राज्यातील जिल्हा परिषदांतील विविध संवर्गातील एकूण 18 हजार 939 पदे भरली जाणार आहेत. 

जिल्हा परिषद अंतर्गत पदभरतीचा अभ्यासक्रम निश्चित होणार

जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातील पदांसाठी दि. 5 जुलै 2014 च्या शासन निर्णयामध्ये प्रत्येक संवर्गासाठी परीक्षेची काठीण्य पातळी ठरवून दिलेली आहे. तथापि, सदरची काठीण्य पातळी प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी पुरेशी नसल्यामुळे तसेच उमेदवारांना अभ्यासक्रमाची माहिती होत नाही. 

यास्तव परीक्षेचा अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याने मा.अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 28 एप्रिल व 29 एप्रिल 2023 रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यशाळेत अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून, जिल्हा परिषद अंतर्गत पदभरती मधील विविध संवर्गातील पदांचा अभ्यासक्रम व प्रश्न पत्रिकेचे स्वरूप ठरवण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद विविध पदांचा तपशील व शैक्षणिक अहर्ता GR येथे पहा


हे सुद्धा पहा
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now