सरकारी नोकरी : जिल्हा परिषद अंतर्गत 18 हजार 939 पदांसाठी मेगा भरती; वयोमर्यादेत मिळणार दोन वर्षाची सूट शासन निर्णय येथे पहा..

Zilla Parishad Bharti 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारने एका वर्षात सरकारी नोकरीच्या 75 हजार जागा भरण्यासाठी कार्यवाही सुरु केलेली आहे, यांतर्गत Zilla Parishad Bharti 2023 साठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील ‘गट-क’ संवर्गातील 18 हजार 939 पदे ही एकाचवेळी भरली जाणार असून, सदर ची पदे 15 ऑगस्ट 2023 पर्यंत भरण्यासाठी शासनाने संबधित विभागांना कळविले आहे, याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया..

जिल्हा परिषदांमधील 18 हजार 939 पदे एकाचवेळी भरणार

zilla parishad bharti 2023

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये जवळपास 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाने संकल्प केला असून,  15 ऑगस्ट 2023 पर्यंत सदर पदे भरण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेतील गट - क संवर्गातील आरोग्य व इतर विभागातील पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम शासनाने जाहीर केला आहे. सदर जाहिरातीद्वारे सर्व जिल्हा परिषदांतील विविध संवर्गातील एकूण 18 हजार 939 पदे भरली जाणार आहेत.

जिल्हा परिषद भरतीसाठी 'आता' कमाल वयोमर्यादेत दोन वर्षाची सूट

कोव्हीड च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होते, त्यादरम्यान शासकीय भरती देखील बंद होती, या दोन वर्षाच्या काळातील उमेदवारांचे नुकसान भरून काढण्यासाठी आता शासनाने राज्यातील सर्व उमेदवारांना जिल्हा परिषद भरती साठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्षाची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील उमेदवारांना आता दिलासा मिळाला आहे.

ग्राम विकास विभागाच्या 16 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार वयाबाबत दोन वर्षाची सुट ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.

बिंदुनामावली अंतिम टप्प्यात

राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमधील रिक्त असलेल्या पदांची बिंदुनामावली अंतिम करण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या 21 नोव्हेंबर 2022 च्या GR नुसार, ही सरळसेवा परीक्षा ‘IBPS’ व ’TCS' या खासगी कंपन्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. 

‘आयबीपीएस’ कंपनीसोबत बैठका घेऊन MOU (सामंजस्य करार) अंतिम करण्यात आला आहे. तसेच सर्व जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी सर्व नोडल अधिकारी तथा उपायुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्तांच्या कार्यालयास पाठविण्यात आला आहे. त्यानुसार  या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद स्तरावर सामंजस्य करारवर स्वाक्षरीची कार्यवाही करावी, असेही ग्रामविकास विभागाने आदेशातून स्पष्ट केले आहे.

जिल्हा परिषद पदभरतीसाठी हेल्पलाईन

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी सदर पदभरतीची माहिती व शंका निरसन व्हावे म्हणून हेल्पलाईन क्रमांक सुरु स्वतंत्र हेल्पलाईन सुरु करावी. परीक्षा होऊन त्या उमेदवारांची नियुक्ती होईपर्यंत हेल्पलाईन सुरुच असावी, असेही आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत.

जिल्हा परिषद विविध पदांचा तपशील व शैक्षणिक अहर्ता GR येथे पहा


हे सुद्धा पहा
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now