Udise Plus 2023 : राज्यातील सर्व शिक्षकांचे आधार कार्ड 'या' तारखेपर्यंत व्हॅलिडेशन करावे लागणार, यु-डायस प्लस परिपत्रक येथे पहा..

Udise Plus Teacher Aadhar Validation 2023 : राज्यातील शाळांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध सरकारी योजनेचा लाभ देण्यासाठी शाळांची संपूर्ण माहिती दरवर्षी Udise Plus याऑनलाईन प्रणाली वर अपडेट करण्यात येते, यावर्षी विद्यार्थ्यांची माहिती Student Database Management System (SDMS) पोर्टल वर अपडेट करण्यात आली असून, 'आता' राज्यातील सर्व शिक्षकांचे आधार कार्ड (Aadhaar Validation) अपडेट करावे लागणार आहे, त्यासाठी 30 एप्रिल 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

राज्यातील सर्व शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन होणार

Udise Plus Teacher Aadhar Validation 2023

यु-डायस प्लस (Udise Plus) या ऑनलाईन प्रणालीमध्ये राज्यातील सर्व शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांची माहिती यु-डायस प्लस सन 2022 23 मध्ये अपडेट करण्यासाठी राज्य सरकारने कळविले आहे, त्यानुसार आता विद्यार्थी माहिती Student Database Management System (SDMS) प्रणालीवर अपडेट करण्याचे काम सुरु असून, शिक्षकांचे Aadhar Validation करून घेण्यासाठी शासनांकडून कळविण्यात आले आहे. त्यानुसार आता 30 एप्रिल 2023 पर्यंत सर्व शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

आधार कार्ड वरील नाव यु-डायस प्लसमध्ये नोंदविणे बाबत सूचना

राज्यातील शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन करताना काही अडचणी येत असल्यास आधार कार्ड वर नोंदविलेले नावाप्रमाणे यु-डायस प्लसमध्ये नाव नोंदविण्याबाबत सांगण्यात आले आहे, त्यानुसार आता 30 एप्रिल 2023 पर्यंत हे काम पूर्ण करून घेण्यास प्राधान्य देण्याबाबत सांगण्यात आले आहे.



नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.


Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now