School Holidays 2023 : विद्यार्थ्यांसाठी आता एक खुशखबर आहे, एप्रिल महिना सुरु होताच सर्वांनाच चाहूल लागते ती, उन्हाळी सुट्टीची, महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शाळांना (Maharashtra School Summer Vacation) उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे, व सोबतच नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा सुरु करण्याबाबत कळविले आहे. कधी लागणार उन्हाळी सुट्टी (School Holidays 2023) आणि केंव्हा सुरु होणार पुन्हा शाळा? वाचा या लेखामध्ये
राज्यातील शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांची उन्हाळी सुट्टी बाबत शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य कार्यालयाने परिपत्रक जारी केले आहे, त्यानुसार आता राज्यातील शाळांना 2 मे 2023 पासून (Maharashtra School Summer Vacation) उन्हाळी सुट्टी लागणार आहे.
यंदा 41 दिवस उन्हाळी सुट्टी मिळणार
उन्हाळी सुट्टी जाहीर झाल्यानंतर पुन्हा नवीन शैक्षणिक सुरु करण्यासाठी उन्हाळी सुट्टीचा कालावधी हा रविवार 11 जून 2023 पर्यंत असणार आहे. म्हणजे या वर्षात शाळांना एकूण 41 दिवस सुट्टी मिळणार आहे. व पुढील शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये शाळा 15 जून 2023 पासून पुन्हा शाळा सुरु होणार आहे.
विदर्भातील शाळांना 56 दिवस सुट्टी
जून महिन्यातील विदर्भाचे तापमान हे जास्त असते, त्यामुळे विदर्भातील शाळा ह्या उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर 26 जून, 2023 रोजी सुरु होणार आहे, त्यामुळे विदर्भातील शाळांना एकूण 56 दिवसाची सुट्टी मिळणार आहे.
शाळांचा निकाल या तारखेला
इयत्ता 1 ली ते 9 वी व इ.11 वी चा निकाल 30 एप्रिल, 2023 रोजी किंवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल असे कळविण्यात आले आहे. मात्र निकाल विद्यार्थी / पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहणार आहे.
स्थानिक सणांच्या दिवसामध्ये सुट्टी चा कालावधी कमी अथवा वाढवण्याचा अधिकार संबंधित जिल्ह्यांना
शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करुन त्याएवेजी गणेशोत्सव, नाताळ यासारख्या सणाचे वेळी समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्या परवानगीने घेण्याबाबत कळविण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्ट्या या 76 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता शिक्षण अधिकाऱ्यांनी द्यावी, असं सुद्धा परिपत्रकात म्हटलं आहे.
नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा 12 जून पासून
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा (School Start Date 2023) 15 जून तर विदर्भातील शाळा मात्र 26 जून 2023 पासून सुरु होणार आहे, त्याबाबतचा शासन निर्णय येथे पहा
{getButton} $text={Download} $icon={GR download}
नवीन शैक्षणिक वर्षातील आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची उद्या निघणार सोडत
दहावी व बारावी बोर्ड परीक्षा निकाल लागणार या तारखेला
महत्वाच्या सरकारी योजनेच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण Whatsapp Group ला जॉईन व्हा.