आनंदाची बातमी ! अखेर 'आरटीई' ऑनलाईन प्रवेश सोडत जाहीर, पालकांना पाठवले प्रवेशाचे मॅसेज SMS येथे पहा..

RTE Lottery Result 2023 24 : राज्यातील पालकांसाठी एक आनंदाची बातमी, बऱ्याच दिवसापासून सर्व पालक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते, ती म्हणजे RTE लॉटरी ची अंतिम यादी कधी जाहीर होणार, नुकतेच आरटीई प्रवेश प्रक्रिया 2023 24 करिता ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली असून, पालकांना मॅसेज पाठवण्यात आले आहेत,  आता राज्यातील 1 लाख 1 हजार 969 बालकांना खाजगी शाळेत मोफत प्रवेश मिळणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती पाहूया.

राज्यातील बालकांना मिळणार खाजगी शाळेत मोफत प्रवेश

RTE Lottery Result 2023 24

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार, राज्यातील आर्थिक व वंचित घटकातील बालकांसाठी खाजगी शाळेत 25 टक्के जागा या 'आरटीई' अंतर्गत राखीव ठेवण्यात येतात, त्यासाठी फेब्रुवारी मार्च महिन्यात शैक्षणिक वर्ष 2023 24 (RTE Admission) करिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

RTE साठी राज्यभरातून 8 हजार 828 शाळांमधील 1 लाख 1 हजार 969 जागांसाठी 3 लाख 64 हजार 390 अर्ज आले होते. त्यामधून लॉटरी पद्धतीने अर्जाची छाननी करून (RTE Lottery Result 2023) अंतिम यादीत बालकांना मोफत प्रवेशासाठी संधी मिळालेली आहे. यापैकी फक्त 1 लाख 1 हजार 969 बालकांचा प्रवेश निश्चित होणार आहे.

अखेर 'आरटीई' प्रवेशाचा मेसेज SMS आला 

'आरटीई' अंतर्गत लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या पालकांच्या मोबाईल क्रमांकावर मेसेज (SMS) पाठवण्यात आले आहेत. तुम्हाला जर काही तांत्रिक अडचणीमुळे मेसेज मिळू शकला नसेल तर RTE पोर्टल सुरु होईपर्यंत वाट पहावी लागेल. त्यानंतर असा चेक करा तुमचा निकाल


येथे चेक करा RTE चा निकाल 

'आरटीई' ची अंतिम निवड यादी जाहीर

'आरटीई' अंतर्गत लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या पालकांच्या मोबाईल क्रमांकावर मेसेज (SMS) पाठवण्यात आले आहेत. त्याचबरोबर RTE च्या अधिकृत पोर्टलवर जिल्हानिहाय यादी आता उपलब्ध झाली आहे.

लॉटरीमध्ये एखाद्या बालकांचे निवड यादीत नाव असेल, मात्र तांत्रिक अडचणीमुळे मोबाईलवर एसएमएस पोहोचू शकला नसेल यासाठी पालकांनी स्वतः आरटीई च्या पोर्टलवर जाऊन लॉगिन करून ऍडमिट कार्ड (Admit Card) या सेक्शन मध्ये जाऊन स्वतः खात्री करून घेणे आवश्यक आहे. 

'आरटीई' प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी सुरु

 'आरटीई' च्या प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांचे कागदपत्र पडताळणी सुरू झालेली असून, ती आता 25 एप्रिल 2023 पर्यंत करून घेणे आवश्यक आहे.

संबंधित तालुका महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षण समिती यांच्याकडून कागदपत्रांची पडताळणी करून आपला प्रवेश निश्चित करून घेण्यास आव्हान करण्यात आले आहे. 'आरटीई' प्रवेशासाठी 30 एप्रिल पर्यंत संबंधित शाळेत प्रवेश घेणे आवश्यक आहे.

'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची लॉटरी यादी येथे पहा

RTE 25 टक्के प्रवेश सोडत जाहीर झाली असून, राज्यातील जिल्हानिहाय सोडत यादी 12 एप्रिल 2023 रोजी दुपारी 3 नंतर लॉटरी लिस्ट पाहण्यासाठी RTE च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन तिथे Admited या सेक्शन मध्ये जाऊन चेक करा. 

{getButton} $text={RTE Portal} $icon={link}


हे सुद्धा वाचा

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                              
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now