RTE Lottery Result List : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम RTE Act 2009 नुसार 'आरटीई' 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. त्यानुसार 2023 24 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत जाहीर झाली असून या लॉटरी चा राज्यस्तरीय संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला आहे. मात्र राज्यातील 8 हजार 828 शाळांची संपूर्ण RTE Lottery Result List सोडत काढण्यासाठी अजून वेळ लागणार आहे, RTE सोडत कशी काढली जाते? आणि केंव्हा लिस्ट पाहायला मिळेल याबाबत संपूर्ण माहिती येथे वाचा
'आरटीई' 25 टक्के लॉटरी प्रक्रिया कशा प्रकारे पार पडते?
'आरटीई' 25 टक्के लॉटरी सोडत कार्यक्रम राज्यस्तरावर पार पडला, मात्र पालकांना लॉटरी लिस्ट कधी येईल? याची प्रतीक्षा लागली आहे, सकाळ पासून RTE च्या पोर्टलवर पालक सातत्याने भेट देत आहे.
मात्र याबाबत एक महत्वाची अपडेट अशी आहे की, लॉटरी ची अंतिम यादी सोडत यासाठी अजून पालकांना काही दिवस वाट बघावी लागणार आहे.
राज्यातील RTE 25 टक्के अंतर्गत जे आर्थिक व वंचित घटकातील बालकांसाठी प्रत्येक शाळानिहाय एकूण 12 राउंड पद्धतीने लॉटरी काढावी लागते त्यामुळे शाळांची संख्या बघता यासाठी अजून थोडे दिवस लागणार आहे. RTE चो सोडत प्रक्रिया कशी पार पडते एका उदा. द्वारे समजून घेऊया
आरक्षण व आर्थिक आणि वंचित घटकातील अर्जानुसार प्रत्येक जिल्हानिहाय प्रत्येक शाळेसाठी एकूण 12 राउंड पद्धतीने सोडत काढली जाते.
- 'आरटीई' पहिला राउंड
- 0 ते 1 किमी साठी पहिला राउंड
- 'आरटीई' दुसरा राउंड
- 1 किमी ते 3 किमी साठी दुसरा राउंड
- 'आरटीई' तिसरा राउंड
- 3 किमी ते 3 पेक्षा जास्त किमी साठी तिसरा राउंड
- त्याचबरोबर आरक्षण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 3 राउंड असे एकूण 6 राउंड पद्धतीने सोडत काढली जाते.
- तसेच वेटिंग लिस्ट साठी 6 राउंड असे एकूण प्रत्येक शाळेसाठी 12 राउंड काढले जातात. हे राउंड Random पद्धतीने काढले जातात. त्यामुळे यासाठी अजून 8 दिवस लागणार आहे.
'आरटीई' 25 टक्के लॉटरी अंतर्गत निवड झालेल्या बालकांना या तारखेला मिळणार मेसेज
आज लॉटरी काढण्याची सोडत सुरु झाली आहे, पण राज्यातील 8 हजार 828 शाळांचे आरक्षणानुसार संपूर्ण राउंड काढण्यासाठी वेळ लागणार आहे.
त्यामुळे ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास अजून काही दिवस जाणार आहे, साधारणपणे आठवड्याचा कालावधी यासाठी लागणार आहे. 12 तारखेला दुपारी 3 वाजेपासून विद्यार्थ्यांना मेसेज यायला सुरुवात होणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांचे लॉटरी मध्ये निवड होईल त्यांना 12 तारखेला दुपारी 3 नंतर जो मोबाईल नंबर ऑनलाईन फॉर्म भरताना दिला असेल त्यावर मेसेज येईल.
त्यानंतर मग पालकांनी जे कागदपत्रे फॉर्म भरताना दिली होती, ती संबंधित कार्यालयात पडताळणीसाठी सादर करावी लागते, त्यानंतर तालुका स्तरीय समिती तुमचा प्रवेश निच्छित करतात.
'आरटीई' 25 टक्के अंतर्गत कागदपत्रांची पडताळणी या तारखेला होणार
'आरटीई' 25 टक्के लॉटरी अंतर्गत निवड झालेल्या बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी दिनांक 13 एप्रिल ते 25 एप्रिल 2023 या कालावधीत होणार आहे.
'आरटीई' 25 टक्के अंतर्गत या तारखेला मिळणार प्रवेश
'आरटीई' 25 टक्के लॉटरी अंतर्गत निवड झालेल्या बालकांना दिनांक 25 ते 30 एप्रिल 2023 पर्यंत संबंधित शाळेत प्रवेश घेणे आवश्यक आहे.
'आरटीई' 25 टक्के सर्वात जास्त व कमी अर्ज या जिल्ह्यात
राज्यातील सर्वात जास्त अर्ज पुणे जिल्ह्याचे असून, सर्वात कमी अर्ज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवेश हे एकूण जागेपैकी कमी आहे, त्यामुळे सर्व बालकांचे प्रवेश सरसकट होण्याची शक्यता आहे, याबाबत अधिकृत माहिती 12 तारखेला मिळणार आहे.
'आरटीई' 25 टक्के प्रवेश सोडत जाहीर, संपूर्ण Live कार्यक्रम येथे पहा
'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची लॉटरी यादी येथे पहा
RTE 25 टक्के प्रवेश सोडत जाहीर झाली असून, राज्यातील जिल्हानिहाय सोडत यादी 12 एप्रिल 2023 रोजी दुपारी 3 नंतर लॉटरी लिस्ट पाहण्यासाठी RTE च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन तिथे Admited या सेक्शन मध्ये जाऊन चेक करा.
नवनविन अपडेट साठी समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.