RTE Lottery Result 2023 24 Date : आरटीई 25 % प्रवेश या संदर्भातील या घडीची सर्वात मोठी बातमी, बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009, शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील आर्थिक आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत मोफत प्रवेश देण्याची योजना आहे, त्यानुसार पुढील शैक्षणिक वर्ष 2023 24 च्या प्रवेश प्रक्रियेसाठी नुकतेच 5 एप्रिल रोजी राज्यस्तरावर आरटीई ची सोडत (RTE Lottery Result) जाहीर करण्यात आली, RTE च्या अधिकृत पोर्टल वर याविषयी माहिती अपडेट करण्यात आली आहे, त्याची सविस्तर माहिती पाहूया..
आरटीई अंतर्गत 1 लाख 1 हजार 969 बालकांना मिळणार मोफत प्रवेश
राज्यात RTE योजने अंतर्गत 8 हजार 828 शाळांमधील 1 लाख 1 हजार 969 जागांसाठी 3 लाख 64 हजार 390 अर्ज आले आहेत. त्यामुळे यापैकी फक्त 1 लाख 1 हजार 969 बालकांचा प्रवेश निश्चित होणार आहे.
'आरटीई' 25 टक्के सोडत जाहीर, लॉटरी प्रक्रिया अंतिम टप्प्यात
'आरटीई' 25 टक्के लॉटरी सोडत जाहीर झाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेचे 'वेळापत्रक' जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील RTE च्या 8 हजार 828 शाळांची संपूर्ण RTE Lottery Result List सोडत काढण्यासाठी वेळ लागत आहे. Live कार्यक्रम येथे पहा
'आरटीई' 25 टक्के लॉटरी प्रक्रिया कशा प्रकारे पार पडते? येथे पहा
मात्र आता याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे, आता 12 एप्रिल 2023 रोजी दुपारी 4 नंतर पालकांना मेसेज SMS येणार असल्याचे पोर्टल वर अपडेट करण्यात आले आहे.
अखेर ! 'आरटीई' 25 टक्के सोडत (लॉटरी) ची यादी या तारखेला
आर. टी. ई. 25% ची लॉटरी अंतिम यादी आता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2023-2024 करिता निवड झालेल्या यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना 12 एप्रिल 2023 रोजी दुपारी 4.00 नंतर एसएमएस पाठवले जातील. असे RTE च्या अधिकृत पोर्टल वर जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता पालकांना बुधवारी RTE च्या लॉटरी ची माहिती मिळणार आहे.
RTE Portal - Click Here
RTE 25% SITE WILL BE CLOSED FOR SELECTION PROCESS FOR ACADEMIC YEAR 2023-2024{alertSuccess}
'आरटीई' चा मेसेज आल्यानंतर लगेच सुरु होणार कागदपत्रे पडताळणी
12 एप्रिल 2023 रोजी RTE अंतर्गत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी तालुका स्तरीय समिती कडून कागदपत्रांची पडताळणी सुरु होणार आहे. 13 ते 25 एप्रिल 2023 कागदपत्रे पडताळणी होणार आहे.
कागदपत्रे पडताळणी नंतर तालुका शिक्षण समिती तुमचा अर्ज पुन्हा Verify करून तुमच्या बालकांचा प्रवेश अंतिम करण्यात येईल. त्यानंतर 30 एप्रिल 2023 पर्यंत संबंधित शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे. अन्यथा वेटिंग लिस्ट मधील बालकांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
नवनविन अपडेट साठी समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.