RTE Admission Last Date 2023 24 : राज्यातील पालकांसाठी एक दिलासादायक बातमी अशी की, 'आरटीई' 25 टक्के प्रवेशासाठी शासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. RTE लॉटरी निकाल जाहीर झाल्यानंतर RTE Portal वारंवार बंद पडत असल्यामुळे पालकांना Admit Card Download करताना अडचणी येत होत्या, त्यामुळे यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्राकाप्रमाणे वेळ कमी पडत असल्याचे लक्षात येताच, आता RTE Admission Last Date प्रवेशाची तारीख वाढवण्यात आली आहे.
'आरटीई' 25 टक्के प्रवेशासाठी मुदतवाढ
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (RTE Act) 2009 नुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रीया संपुर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येते.
सन 2023 24 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क कायद्या नुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये अंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या प्रवेशाकरीता मुदतवाढ देण्यात आली आहे.
'आरटीई' 25 टक्के अंतिम निवड यादी जाहीर | RTE Lottery Result 2023
'आरटीई' अंतर्गत राज्यभरात 8 हजार 823 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 846 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार 3 लाख 64 हजार 413 अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून 5 एप्रिल 2023 रोजी RTE Lottery सोडत जाहीर करण्यात आली.
लॉटरी पद्धतीने काढलेल्या सोडतीनुसार राज्यातील 94 हजार 700 मुलांची RTE प्रवेशासाठी अंतिम Selection List जाहीर करण्यात आली असून, निवड झालेल्या पालकांना 12 एप्रिल रोजी मोबाईल क्रमांकावर SMS पाठवण्यात आले आहे. तसेच RTE Login मध्ये Admit Card प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.
RTE प्रवेशाच्या Waiting List मध्ये 81 हजार 129 बालकांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर RTE Waiting मधील पालकांना SMS पाठवण्यात येणार आहे.
'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची नवीन तारीख जाहीर | RTE Admission Last Date 2023 24
त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडत (लॉटरी) बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी काढण्यात आली आहे.
यादीतील बालकांचे प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 25 एप्रिल 2023 पर्यंत देण्यात आली होती, मात्र आता RTE अंतर्गत प्रवेश घेण्याची मुदत ही 8 मे 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.