RTE Admission Documents List 2023 24 : 'आरटीई' 25 टक्के प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत लॉटरी मध्ये निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशाकरिता कागदपत्रे पडताळणी सुरु असून, RTE Admission निश्चित करण्याकरिता ऑनलाईन अर्जात नमूद केलेले कागदपत्रे तपासणी करण्यात येत आहे, यामध्ये प्रामुख्याने मुलाचे Aadhaar Card संदर्भात पालकांना अडचणी येत आहे, आधार कार्ड नसेल किंवा आधार कार्ड पावती वर प्रवेश निश्चित होईल का? असे असंख्य प्रश्न पालक सातत्याने विचारात आहे, यावर आता शासनाने RTE प्रवेशासाठी मुलांना आधार कार्ड बाबत 90 दिवसाची सवलत देण्यात आली आहे, याबाबतची सविस्तर माहिती पाहूया..
आरटीई प्रवेशाकरिता पुरेसा वेळ मिळणार
'आरटीई' 25 टक्के प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार येत असल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे, तरी याबाबत पालकांनी कोणतीही भीती /संभ्रम बाळगू नये. तसेच ज्या बालकांची प्रवेशासाठी सोडत ( लॉटरी )द्वारे निवड झाली आहे, अशा बालकांना शाळा प्रवेशाकरिता पुरेसा कालावधी देण्यात येणार आहे.
'आरटीई' 25 टक्के प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
'आरटीई' 25 टक्के प्रवेशासाठी प्रामुख्याने मुलाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही Documents आरटीई प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत. त्यासोबतच इतर आर्थिक व वंचित घटकातील संवार्गानुसार संबंधित Documents देखील सादर करणे आवश्यक आहे.
आरटीई प्रवेश कागदपत्रे 2023 24 | RTE Admission Documents List
- आधार कार्ड (मुलाचे नसल्यास पालकांचे)
- रहिवाशी प्रमाणपत्र वास्तव्याचा पुरावा
- जन्माचा दाखला (जन्म दाखला)
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला (एक लाखापेक्षा कमी उत्पन्न)
- जातीचा दाखला - वंचित जात सवर्गातील असल्यास वडिलांचे व बालकाचे जात प्रमाणपत्र
- दिव्यांग असल्यास - जिल्हा शल्यचिकित्सक यांचे किमान 40% चे दिव्यांग प्रमाणपत्र
- एकल पालकत्व असल्यास आई किंवा वडील यांचे (single parent) कागदपत्रे
- घटस्फोटित महिला असल्यास संबंधित कागदपत्रे
- न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला असल्यास संबंधित कागदपत्रे
- विधवा महिला असल्यास संबंधित कागदपत्रे
- HIV बाधित/प्रभावित असल्यास संबंधित कागदपत्रे
- अनाथ बालके असल्यास आवश्यक कागदपत्रे
RTE 25% Online प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी Online प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. अधिकृत माहिती येथे पहा
'आरटीई' 25 टक्के प्रवेशासाठी 'आधार कार्ड' साठी वाढीव मुदत
'आधार कार्ड' हे कागदपत्र सर्वांसाठी बंधनकारक करण्यात आले असून आता 'आरटीई' 25 टक्के प्रवेशाकरिता वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक आहे. मात्र लहान मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी पालकांना अडचणी निर्माण होत आहे त्यामुळे आता 'आरटीई' 25 टक्के प्रवेशाकरिता आधार कार्ड काढण्यासाठी 90 दिवसांची सवलत देण्यात आली आहे.
'आरटीई' 25 टक्के प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी / पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात आली आहे.
परंतु काही कारणांमुळे बालक / पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे / पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात येईल.
'आरटीई' 25 टक्के प्रवेशासाठी नवीन नियम 2023
- 'आरटीई' 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जामध्ये सादर केलेली कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- RTE 25% Online प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी Online प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत.
- विद्यार्थ्याचे आधार कार्ड / नसेल तर पालकांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात आली आहे.
- सदरचे आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसांच्या आत शाळेकडे सादर करणे आवश्यक आहे.
- कोव्हीड प्रभावित बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे - मृत्यु प्रमाणपत्र , कोव्हीड १९ मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, (Medical Certification of Cause of Death ( Form No. 4), (SeeRule7) सदर मृत्यू कोव्हीड १९ शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र
- अनाथ बालकांसाठी अनाथालयाची / बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरणार, बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक आहे.