RTE Admission : 'आरटीई' पोर्टल वारंवार बंद पडत असल्याने पालकांची होतेय दमछाक, 'आरटीई' प्रवेशासाठी पुरेसा वेळ मिळणार

RTE School Admission Date 2023 24 : RTE 25 टक्के Admission 2023 24 प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, Lottery Result 2023 जाहीर करण्यात आला आहे, त्यानुसार आता सद्यस्थितीत RTE साठी निवड झालेल्या मुलांचे कागदपत्रे तपासणीचे काम सुरु आहे, मात्र RTE चे Portal वारंवार बंद पडत असल्यामुळे Online Admission Process साठी व्यत्यय येत आहे, 8 मे 2023 पर्यंत Documents पडताळणी करण्याबाबत कळविण्यात आले आहे, मात्र पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे आता शिक्षण संचनालय पुणे यांच्याकडून याबाबत महत्वाची अपडेट देण्यात आली आहे, सविस्तर पाहूया..

'आरटीई' 25 टक्के प्रवेश प्रक्रिया | RTE School Admission 2023 24

RTE School Admission Date 2023 24

शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यामध्ये 'आरटीई' 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने दरवर्षी राबविण्यात येते. RTE अंतर्गत राज्यातील आर्थिक व वंचित घटकातील बालकांना नामांकित खाजगी शाळेत मोफत प्रवेश देण्यात येतो.

शैक्षणिक वर्ष 2023 24 करिता वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी, यंदा RTE School Admission Process जानेवारी महिन्यातच सुरु केली आहे. त्यानुसार राज्यातील पालकांना RTE Admission करिता Online Form भरण्यासाठी फेब्रुवारी, मार्च महिन्यात मुदत देण्यात आली होती.

'आरटीई' 25 टक्के अंतिम निवड यादी जाहीर | RTE Lottery Result 2023

'आरटीई' अंतर्गत राज्यभरात 8 हजार 823 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 846 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार 3 लाख 64 हजार 413 अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून 5 एप्रिल 2023 रोजी RTE Lottery सोडत जाहीर करण्यात आली.

लॉटरी पद्धतीने काढलेल्या सोडतीनुसार राज्यातील 94 हजार 700 मुलांची RTE प्रवेशासाठी अंतिम Selection List जाहीर करण्यात आली असून, निवड झालेल्या पालकांना 12 एप्रिल रोजी मोबाईल क्रमांकावर SMS पाठवण्यात आले आहे. तसेच RTE Login मध्ये Admit Card प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.

RTE प्रवेशाच्या Waiting List मध्ये 81 हजार 129 बालकांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर RTE Waiting मधील पालकांना SMS पाठवण्यात येणार आहे.

'आरटीई' प्रवेशासाठी कागदपत्रे पडताळणी सुरु

RTE 25% Admission 2023 24 करिता निवड झालेल्या बालकांचे कागदपत्रे पडताळणी 13 एप्रिल 2023 पासून सुरु करण्याबाबत कळविण्यात आले होते, मात्र RTE Portal Website वर अतिरिक्त भार येत असल्यामुळे पालकांना Admit Card  Download करण्यासाठी तांत्रिक अडचणी येत होत्या.

त्यावर उपाय म्हणून RTE प्रवेशासाठी पर्यायी व्यवस्था https://student.maharashtra.gov.in/ ही नवीन वेबसाईट सुरु करण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील 7 हजार 913 बालकांचे RTE प्रवेश निश्चित झाले आहे.

ज्या बालकांची निवड यादी मध्ये 'आरटीई'  प्रवेशासाठी निवड झाली आहे, त्या बालकांच्या पालकांनी दिनांक 13 एप्रिल 2023 ते 8 मे 2023 या कालावधीत पंचायत समिती / महानगरपालिका स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून करून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याबाबत कळविण्यात आले आहे. 
'आरटीई' लॉटरी पहिली यादी जाहीर येथे पहा

मात्र अजूनही RTE चे पोर्टल वारंवार स्लो होत असल्यामुळे पालक RTE प्रवेशासाठी वाढीव मुदत मिळावी यासाठी मागणी करत आहे, त्यावर आता शिक्षण संचनालय पुणे यांनी जाहीर प्रकटन काढून पालकांना सूचना दिल्या आहेत.

'आरटीई' प्रवेशासाठी पुरेसा वेळ मिळणार, शिक्षण संचनालय (प्राथ) पुणे यांची माहिती

सद्यस्थितीत आरटीई 25 टक्के प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार येत असल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी याबाबत पालकांनी कोणतीही भिती / संभ्रम बाळगू नये, तसेच ज्या बालकांची प्रवेशासाठी सोडत (लॉटरी) व्दारे निवड झाली आहे, अशा बालकांना शाळा प्रवेशाकरिता पुरेसा कालावधी देण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचनालय पुणे यांनी काढलेल्या प्रकटनात म्हटले आहे. 

त्यामुळे आता यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार RTE च्या प्रवेश प्रक्रियेसाठी वेळ कमी कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. आता याबाबत यापूर्वीच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असून, RTE प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत पालकांनी वेळोवेळी RTE च्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी. RTE नवीन वेळापत्रक येथे पहा

संबंधित बातम्या

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

    

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now