RTE Addmission Documents list 2023 : राज्यातील पालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, आरटीई लॉटरी चा RTE Maharashtra Lottery Result 2023 24 PDF निकाल आज जाहीर होणार असून, पोर्टलवर अंतिम मुलांची निवड यादी अपडेट करण्याचे काम सुरू आहे, 12 एप्रिल 2023 रोजी 4 वाजेपासून पालकांना मेसेज मिळणार आहे, तसेच पोर्टलवर लॉटरीचा निकाल पाहता येणार आहे, याबद्दल सविस्तर माहिती पाहूया..
आर टी ई प्रवेश ऑनलाईन सोडत जाहीर
आर टी ई प्रवेश 2023 24 प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत जाहीर झाली असून, अंतिम निवड यादी RTE च्या अधिकृत पोर्टलवर अपडेट करण्याचे काम सुरू आहे.
महाराष्ट्र राज्यातील RTE प्रवेश प्रक्रियेसाठी 8 हजार 828 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 969 बालकांना मोफत प्रवेश मिळणार आहे. त्यांची यादी आज पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहे.
यंदा राज्यभरातून आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये राज्यातून जवळपास 3 लाख 64 हजार 390 अर्ज प्राप्त झाले आहेत.
मात्र राज्यातील एकूण RTE च्या जागा या 1 लाख 1 हजार 969 आहे. या जागांसाठी लॉटरी काढण्यात आली असून आज पालकांना मोबाईल वर मेसेज एसएमएस मिळणार आहे.
एसएमएस वर विसंबून न राहता असे चेक करा निकाल
'आरटीई' प्रवेश प्रक्रियेचे असे असणार 'नवीन' वेळापत्रक
आरटीई प्रवेशाची अंतिम यादी दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी जाहीर करण्यात येईल, त्यानंतर 13 एप्रिल ते 8 मे पर्यंत तालुका, मनपा स्तरावर शिक्षण समिती तुमची कागदपत्रे पडताळणी करतील.
ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही जे कागदपत्रे सादर केली होती, ती कागदपत्रे तुम्हाला सादर करावे लागतील, त्यानंतर तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल.
'आरटीई' प्रवेशासाठी ही कागदपत्रे आवश्यक | RTE Admission Documents List 2023-24
आरटीई अंतर्गत ऑनलाईन अर्ज करताना तुंम्ही अर्जामध्ये जी माहिती भरली आहे, त्यासंबंधित कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागणार आहे.
आरटीई प्रवेश 2022-23 महाराष्ट्राची कागदपत्रे (RTE Admission Documents List)
- रहिवाशी प्रमाणपत्र वास्तव्याचा पुरावा
- जन्माचा दाखला (जन्म दाखला)
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला (एक लाखापेक्षा कमी उत्पन्न)
- जातीचा दाखला - वंचित जात सवर्गातील असल्यास वडिलांचे व बालकाचे जात प्रमाणपत्र
- दिव्यांग असल्यास - जिल्हा शल्यचिकित्सक यांचे किमान 40% चे दिव्यांग प्रमाणपत्र
- एकल पालकत्व असल्यास आई किंवा वडील यांचे (single parent) कागदपत्रे
- घटस्फोटित महिला असल्यास संबंधित कागदपत्रे
- न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला असल्यास संबंधित कागदपत्रे
- विधवा महिला असल्यास संबंधित कागदपत्रे
- HIV बाधित/प्रभावित असल्यास संबंधित कागदपत्रे
- अनाथ बालके असल्यास आवश्यक कागदपत्रे
RTE प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबविली जाते, त्यामध्ये राज्यातील एकूण रिक्त जागेनुसार RTE ची सोडत लॉटरी ही रँडम पद्धतीने काढण्यात येते.
लॉटरीची अंतिम यादी तयार करताना म्हणजेच सोडत काढत असताना प्रत्येक शाळा निहाय आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील राखीव जागा यानुसार RTE चे राऊंड होतात.
प्रत्येक शाळा निहाय निवड यादीसाठी आणि वेटिंग लिस्ट यासाठी 6 राउंड असे एकूण 12 राऊंड मध्ये प्रत्येक शाळानिहाय लॉटरी काढली जाते. याबद्दल सविस्तर माहिती येथे पहा.
लॉटरी काढण्याची प्रक्रिया येथे पहा
{getButton} $text={Website Link} $icon={link}
नवनविन अपडेट साठी समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.