PM SHRI Yojana 2023 : राज्यातील ‘पीएमश्री’ शाळांना प्रत्येकी 1 कोटी 88 लाख रुपये रक्कम मंजूर

PM SHRI Schools Yojana 2023 : पीएम श्री (Pradhan Mantri Schools For Rising India) योजने अंतर्गत देशातील 14 हजार 500 शाळांचा या योजनेत समावेश आहे, यामध्ये महाराष्ट्र राज्यातील पहिल्या टप्प्यासाठी 516 शाळांचा समावेश आहे. जिल्हानिहाय शाळांची संख्या (PM SHRI Schools List 2023) पुढे दिलेली आहे. 'नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020नुसार PM SHRI Schools Scheme योजना राबविली जात आहे. नुकतेच राज्य सरकारने राज्यातील शाळांना PM Shri School अंतर्गत एका शाळेसाठी 1 कोटी 88 लाख रुपये एवढा खर्च करण्यास मान्यता दिलेली आहे. विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून आदर्श शाळा विकसित करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

पीएमश्री योजना काय आहे? | PM SHRI Schools Scheme 

केंद्र सरकारने 7 सप्टेंबर 2022 रोजी केंद्र पुरस्कृत PM SHRI योजनेला मान्यता दिली, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि विशिष्ट कालावधीत आदर्श शाळा विकसित करणे तसेच निष्पक्षता, प्रवेश, गुणवत्ता आणि समावेश या पातळ्यांवर सर्वसमावेशक, समर्पित समग्र परिवर्तन घडविण्याचा या योजनेचा उद्देश आहे. 

pm shri schools scheme
pm shri schools scheme

याअनुषंगाने देशभरात एकूण 14 हजार 500 शाळा निर्माण करण्यात येणार आहेत. ही योजना 5 वर्षांसाठी राबविली जाणार असून याअंतर्गत निवड झालेल्या सध्याच्या शाळा आदर्श शाळांमध्ये रूपांतरित होणार आहेत.

या योजनेतील करारानुसार निवड झालेल्या शाळांसाठी 60 टक्के निधी केंद्र शासनाकडून मिळणार असून, राज्य शासनाचा हिस्सा 40 टक्के असणार आहे. यासाठी राज्य शासन प्रती शाळा पाच वर्षांसाठी 1 कोटी 88 लाख एवढा निधी शाळांना मिळणार आहे.

PM SHRI शाळांची निवड निकष काय होते? | PM SHRI Schools Scheme Criteria

पीएमश्री योजनेअंतर्गत शाळांची पारदर्शकपणे निवड करण्यासाठी pmshrischools.education.gov.in या पोर्टलवर शाळांनी स्वतः अर्ज करून विविध तीन आव्हानांचे टप्पे पार करणे आवश्यक होते. 

त्यानुसार प्राथमिक आणि माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांनी ऑनलाईन अर्ज केले. या टप्प्यांमध्ये पात्र ठरण्यासाठी शहरी भागांसाठी 70 टक्के तर ग्रामीण भागांसाठी 60 टक्के गुण मिळविणे आवश्यक होते. हे टप्पे पार करणाऱ्या शाळांची तज्ज्ञांच्या समितीने राज्यातील 426 प्राथमिक आणि 90 माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांची पहिल्या टप्प्यात निवड निवड केली आहे.

पीएमश्री शाळांतील विविध उपक्रमांसाठी केलेली तरतूद | PM SHRI Schools Scheme Provision

राज्य शासनाने पीएमश्री योजनेच्या राज्याच्या हिस्स्यापोटी 91 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 2022-23 मध्ये आदर्श शाळांसाठी 479 कोटींची तरतूद करण्यात आली होती, त्यापैकी 254 कोटी रू वितरीत करण्यात आले आहेत. 

पुढील शैक्षणिक वर्षी मोठ्या बांधकामांसाठी प्राथमिक शाळांसाठी 199.40 कोटी तर माध्यमिक शाळांसाठी 56 कोटी 12 लाख इतका निधी ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे समग्र शिक्षा अंतर्गत पायाभूत सुविधांसाठी 86 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

येत्या वर्षात 1351 आयसीटी लॅब, 2040 डिजिटल लायब्ररी, 10 हजार 594 स्मार्ट क्लासरूम्स, शिक्षकांसाठी 97 हजार 249 टॅबलेटस्, 105 स्टेम लॅब, 533 टिंकरिंग लॅब तयार करण्यात येणार आहेत.

पीएमश्री योजनेअंतर्गत निवड झालेल्या शाळांच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी होण्याबरोबरच केंद्राच्या सहकार्याने दर्जेदार शिक्षणासाठी आदर्श शाळा विकसित होतील, असा विश्वास मंत्री श्री.केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

पीएमश्री शाळांची जिल्हानिहाय संख्या - PM SHRI Schools List 2023

PM SHRI योजनेअंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्या मध्ये 516 शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक एक शाळा 1 कोटी 88 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. 

पीएमश्री योजनेसाठीचे निकष पूर्ण करणाऱ्या, शासन अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या 426 प्राथमिक आणि 90 माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

राज्यातील निवड झालेल्या जिल्हानिहाय शाळा पुढीलप्रमाणे

अकोला - 11, अमरावती - 18, औरंगाबाद - 11, बीड - 13, भंडारा - 12, गोंदिया - 13, हिंगोली - 5, जळगाव - 18, लातूर -13, नागपूर - 21, नांदेड - 18, नंदुरबार - 8, पालघर - 11, परभणी - 11, बुलढाणा - 22, चंद्रपूर - 18, उस्मानाबाद - 9, अहमदनगर - 21, गडचिरोली - 16, कोल्हापूर -18, नाशिक - 26, पुणे -23, रायगड - 20, रत्नागिरी - 13, सांगली - 14, सातारा -18, सिंधुदुर्ग -13, सोलापूर -23, ठाणे -14, वर्धा - 13, वाशिम -7, यवतमाळ -26, धुळे -7 आणि जालना जिल्ह्यातील - 12 शाळांना पीएमश्री योजनेअंतर्गत मान्यता मिळाली आहे.

पीएमश्री पोर्टल - pmshrischools.education.gov.in 

आणखी सरकारी योजना वाचा

महत्वाच्या सरकारी योजनेच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now