सुवर्ण संधी : रोजगार मेळाव्यात 2 हजारपेक्षा जास्त पदांसाठी 'या' दिवशी होणार मुलाखती, पदांचा पसंती क्रम ऑनलाईन येथे भरा...

Pandit Dindayal Upadhyay Job Fair : महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून विचार प्रबोधन वर्ष 2023 झाले आहे, त्यानुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व बानाई संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 21 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी पिंपरी येथे पंडित दिनदयाल उपाध्याय महारोजगार (Pandit Dindayal Upadhyay Job) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांतर्गत 2 हजार हून अधिक पदांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहे, या संधीचा लाभ घेण्यासाठी सविस्तर माहिती पाहूया..

रोजगार मेळाव्यात 2 हजारहून अधिक पदांसाठी मुलाखती

Pandit Dindayal Upadhyay Job Fair

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार (Pandit Dindayal Upadhyay Job Fair) मेळाव्यामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रामधील खाजगी उद्योजक सहभागी होणार असून, त्यांच्यामार्फत जवळपास 2 हजारहून अधिक रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. 

हा रोजगार मेळावा पुणे जिल्ह्यासाठी असून 21 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा आयटीआय मोरवाडी, पिंपरी, पुणे 18 (ITI, MORWADI, PIMPRI,PUNE 18)  येथे आयोजित करण्यात आला आहे.

रोजगार मेळावा कधी व कोठे होणार ?

  • रोजगार मेळावा आयोजन दिनांक -  21 एप्रिल 2023
  • वेळ - सकाळी 10 वाजता 
  • मेळाव्याचे ठिकाण - आयटीआय मोरवाडी, पिंपरी, पुणे 18 (ITI, MORWADI, PIMPRI,PUNE 18)  

या पदांसाठी होणार मुलाखती

  • फुल स्टॅक जावा डेव्हलपर (Full stack java developer)
  • मदतनीस / तंत्रज्ञ / टेलिकॉलर / सेवा सल्लागार (Helper / technician / tellcaller/ service adviser)
  • प्रशिक्षणार्थी (Apprentice trainee)
  • मशिन ऑपरेटर / टर्नर / वेल्डर / फिटर / मशीनिस्ट / इलेक्ट्रिशियन
  • एक्झिक्युटिव्ह (Machine operator / turner / welder / fitter / machinist / elctrician Excutive)
  • विक्री कार्यकारी दाखल (Filed sales executive)
  • मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स (Mechanical / electrical / electronics)
  • टूल आणि डाय मेकर / इलेक्ट्रिशियन / प्रेस ऑपरेटर / इलेक्ट्रॉनिक इंजीजी / फिटर / वेल्डर / हेल्पर (Tool and die maker / electrician / press operator / electronic engg /fitter / welder / helper)

पात्रता

या विविध पदांकरिता किमान इयत्ता 10 वी, 12 वी तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, पदविकाधारक, अभियांत्रिकी पदवी, एमबीए, बीसीए उत्तीर्ण आदी (graduate, post graduate, ITI, graduate, engineering degree, MBA, BCA pass etc) पात्रताधारक स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.

येथे नोदवा आपले पसंतीक्रम

इच्छुक उमेदवारांनी आपले पसंती क्रम http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आपले नोंदविणे आवश्यक आहे. 

येथे करा नोंदणी (पंसती क्रम) - {getButton} $text={Website Link} $icon={link}

मेळाव्याच्या दिवशी प्रत्यक्ष (Interview) मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे फोटो, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात. 

या संधीचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे आयुक्त यांनी केले आहे.

रोजगार मेळाव्यातील पदनिहाय संपूर्ण माहिती येथे पहा


हे सुद्धा पहा

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

    

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now