Maharashtra Online Teacher Transfer 2024 : राज्यातील शिक्षकांच्या ZP School Teacher Transfer बदली प्रक्रिया 7 एप्रिल च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येत आहे. ही बदली प्रक्रिया शिक्षक बदलीची प्रक्रिया ही Teacher Transfer Management System या संगणकीय प्रणालीमार्फत Online Teacher Transfer Portal (OTT) द्वारे राबविण्यात येत आहे, बदली अभ्यासगट समितीने नुकतेच बदली धोरणात 26 प्रकारच्या सुधारणा सुचविल्या आहेत, राज्यातील शिक्षक बदली कशा पद्धतीने राबविली जाते? बदली प्रक्रियेचे एकूण 6 टप्पे समजून घेणार आहोत, तसेच विशेष संवर्ग 1 व 2 आणि बदलीस पात्र शिक्षक, अधिकार प्राप्त शिक्षक यामध्ये कोणत्या शिक्षकांचा समावेश होतो? सविस्तर पाहूया..
शिक्षक बदलीचे सुधारित धोरण | Online Teacher Transfer Maharashtra
जिल्हा परिषदे अंतर्गत गट क (Class-3) व गट ड (Class-4) कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत 2014 व 2015 च्या शासन निर्णयानुसार धोरण निश्चित केलेले आहे. सदर धोरणानुसार जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्याही जिल्हांतर्गत बदल्या करण्यात येत होत्या.
परंतु शिक्षक संवर्गाची मोठी संख्या, त्यांचे इतर संवर्गापेक्षा असलेले कामाचे भिन्न स्वरुप लक्षात घेऊन, त्यांच्या बदलीबाबत स्वतंत्रपणे वेगळयाने विचार करावयाची बाब शासनस्तरावर करण्यात आली.
त्यानुसार शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निश्चित करताना शिक्षकांना केंद्रबिंदू मानून तसेच त्यांना काम करीत असताना उदभवणाऱ्या अडी-अडचणी विचारात घेऊन शिक्षकांचे बदली धोरण 2017 च्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले.
परंतु त्यामध्ये सुधारणा करून आता सध्या 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया Online Teacher Transfer Portal या ऑनलाईन संगणक प्रणाली (Teacher Transfer Management System) द्वारे राबविण्यात येत आहे.
तसेच आंतरजिल्हा बदली प्रक्रिया देखील 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयामधील निश्चित केलेल्या धोरणानुसार राबविण्यात येत आहे.
शिक्षक बदली प्रक्रिया राबविण्याची कार्यपद्धती
जिल्हांतर्गत शिक्षकांच्या बदल्या ह्या सद्यास्थित 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयातील बदली विषयक धोरणानुसार राबविण्यात येत आहे. राज्यामध्ये शिक्षक बदलीची प्रक्रिया ही Teacher Transfer Management System या संगणकीय प्रणालीमार्फत Online Teacher Transfer Portal (OTT) द्वारे राबविण्यात येत आहे.
शिक्षक बदली धोरणानुसार राज्यातील शिक्षकांच्या बदल्या ह्या एकूण सहा टप्यामध्ये करण्यात येत आहे. प्रत्येक टप्प्यामधील बदली विषयक कार्यपद्धती पुढीलप्रमाणे..
शिक्षक बदली टप्पा क्रमांक - 1
शिक्षक बदली प्रक्रिया राबविताना टप्पा क्रमांक 1 मध्ये शाळांमध्ये ठेवावयाच्या रिक्त पदांच्या बदली धोरणातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येते व रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येते.
शिक्षक बदली टप्पा क्रमांक - 2
विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 यांच्या बदल्या या टप्पा क्रमांक 2 अंतर्गत करण्यात येतात.
टप्पा क्रमांक 1 प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करून, विशेष संवर्ग 1 मधील शिक्षकांना पसंती क्रम भरून घेणे व बदली धोरण तरतुदीनुसार बदल्या केल्या जातात.
विशेष संवर्ग शिक्षक भाग - 1 मध्ये 'या' शिक्षकांचा समावेश
विशेष संवर्ग शिक्षक भाग एक मध्ये - विविध गंभीर स्वरूपाचे आजार, दिव्यांग शिक्षक, विधवा शिक्षक, कुमारिका शिक्षक, घटस्फोटित महिला शिक्षक, वयाची 53 वर्ष पूर्ण झालेले शिक्षक, स्वातंत्र्य सैनिकांचा (मुलगा, मुलगी, नातू, नात), शिक्षकांचे जोडीदार विशेष गंभीर आजाराने ग्रस्त असलेले शिक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे.
शिक्षक बदली टप्पा क्रमांक - 3
विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 यांच्या बदल्या टप्पा क्रमांक 3 मध्ये करण्यात येतात.
टप्पा क्रमांक 2 प्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर सुधारित रिक्त पदांची यादी जाहीर करून, विशेष संवर्ग 2 मधील शिक्षकांचे पसंतीक्रम भरून घेऊन बदली धोरण तरतुदीनुसार बदल्या करणे.
विशेष संवर्ग शिक्षक भाग - 2 मध्ये 'या' शिक्षकांचा समावेश
विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 पती पत्नी एकत्रीकरण (दोंघाच्या शाळेमधील अंतर 30 किमी पेक्षा अधिक) व इतर विभागांतर्गत सेवेत असलेल्या पती पत्नी एकत्रीकरण अंतर्गत टप्पा क्रमांक 3 मध्ये बदल्या करण्यात येतात.
शिक्षक बदली टप्पा क्रमांक 4
टप्पा क्रमांक 4 मध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतात.
टप्पा क्रमांक 3 प्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करणे, बदली अधिकार प्राप्त शिक्षकांचे पसंतीक्रम भरून बदली धोरण तरतुदीनुसार बदल्या करणे.
बदली अधिकार प्राप्त शिक्षक यामध्ये 'या' शिक्षकांचा होतो समावेश
बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक - बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक असतात.
शिक्षक बदली टप्पा क्रमांक 5
बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्या या टप्पा क्रमांक 5 अंतर्गत करण्यात येतात.
टप्पा क्रं 1,2,3, व 4 मध्ये नमुद केलेल्या कार्यपध्दतीमुळे, बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक व ज्या शिक्षकांनी बदलीची विनंती केली आहे त्या सर्वाची एक ज्येष्ठता यादी जाहीर करण्यात येते, त्यानंतर पसंतीक्रम भरून बदली धोरण तरतुदीनुसार बदल्या करणे.
बदलीस पात्र शिक्षक यामध्ये 'या' शिक्षकांचा होतो समावेश
बदलीस पात्र शिक्षक - बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा 10 वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा 5 वर्षे पुर्ण झलेली आहे असे शिक्षक.
तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे पुर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील 5 वर्षे सेवेची अट लागू राहत नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे पुर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करुन पदस्थापित करण्यात येते.
शिक्षक बदली टप्पा क्रमांक 6
विस्थापित शिक्षकांसाठी शेवटचा टप्पा
टप्पा क्रमांक 5 पूर्ण झाल्यानंतर सुधारित यादी जाहीर करून, टप्पा 5 मधील उरलेल्या शिक्षकांना पसंतीक्रम भरून घेऊन, बदली धोरण तरतुदीनुसार बदल्या करणे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आनंतरजिल्हा बदलीचे सुधारित धोरण - शासन निर्णय (2024)
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आनंतरजिल्हा बदलीचे सुधारित धोरण - शासन निर्णय (2023)