Online Teacher Transfer News 2023 : राज्यातील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही Teacher Transfer Management System या संगणकीय प्रणालीमार्फत Online Teacher Transfer Portal (OTT) द्वारे राबविण्यात येत आहे, शिक्षक बदली धोरण शासन निर्णय 7 एप्रिल नुसार एकूण 6 टप्यामध्ये शिक्षक बदली प्रक्रिया होत असून, बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश निर्गमित करण्याबाबत कळविण्यात आले आहे, यावर्षी राज्यातील 40 हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून, त्यामध्ये 83 टक्के शिक्षकांना त्यांनी निवडलेल्या पहिल्या 5 शाळांपैकी त्यांना शाळा मिळाली आहे, यावर्षीच्या बदली धोरणात सुधारणा करण्यासाठी शिक्षक बदली अभ्यास गटाने एकूण 26 प्रकारच्या सुधारणा सुचवल्या आहेत, अशी माहिती अभ्यासगटाचे प्रमुख मा आयुष प्रसाद यांनी मीडियाशी बोलताना दिली याविषयीची सविस्तर माहिती पाहूया..
शिक्षक बदली धोरणातील 26 सुधारणा प्रस्ताव शासनाकडे सादर करणार
राज्यातील जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया एकूण सहा टप्यामध्ये राबविण्यात येत आहे, 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयातील सुधारित बदली धोरण तरदुतीमध्ये सुधारणा करण्याबाबत शिक्षक संघटनानी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली बाबत शिक्षकांच्या मागणीनुसार शिक्षक बदली धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.
राज्यभरातील शिक्षकांकडून ऑनलाईन सूचना मागविण्यात आल्या होत्या, त्यामध्ये जवळपास 8 हजार सूचना प्राप्त झाल्या होत्या, त्यातील महत्वाच्या अशा 30 सूचना निवडून अभ्यासगटाने त्यातील कायद्यानुसार सर्व समानता धोरण लक्षात घेता 26 सुधारणाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती मा. आयुष प्रसाद यांनी मीडियाशी बोलताना दिली.
राज्यातील शिक्षक बदली धोरणात सर्वासाठी समानता धोरण
राज्यातील दुर्गम भागातील शाळांवर काम करणाऱ्या महिला शिक्षिका यांची बदली धोरणांमध्ये अवघड क्षेत्रातून सुट मिळावी, यासाठी मागणी करण्यात आली होती. या मागणीचा विचार केला असता, अवघड क्षेत्रांमध्ये इतर विभागातील महिलांना नियुक्त केले जाते, जसे की, आरोग्य सेविका, तलाठी, ग्रामसेविका यांची अवघड क्षेत्रात पोस्टिंग असल्यामुळे मग शिक्षिकांनाच सूट का? महिलांना ही सवलत कोणत्या आधारावर द्यायची? हा एक प्रश्न समितीपुढे निर्माण झाला होता त्यामुळे सद्या तरी यावर तोडगा निघालेला नाही. राज्यातील शिक्षक बदली धोरणात सर्वासाठी समानता धोरण राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
शिक्षक बदली अभ्यासगटाने सुचविल्या 26 प्रकारच्या सुधारणा
- विशेष संवर्ग भाग 1 मधील शिक्षकांना विनंती बदलीसाठी 3 वर्ष सेवेची अट लागू राहणार नाही.
- जे शिक्षक पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत त्यांचा समावेश बदली प्रक्रियेमध्ये होणार नाही.
- विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत विनंती बदलीसाठी होकार / नकार दर्शवल्यास तसेच दिलेले पर्याय उपलब्ध न झाल्यास संबंधित शिक्षकाची बदली पुढील संवर्गामध्ये पात्र होत असल्यास संबंधितांना बदलीची संधी देण्यात येईल.
- विशेष संवर्ग भाग 1अंतर्गत पात्र शिक्षकाने बदलीतून सूट घेतल्यास संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदलीपात्र असल्यास जोडीदाराची पात्रतेनुसार संबंधित संवर्गातून बदली केली जाईल.
- विशेष संवर्ग भाग 2 अंतर्गत संबंधित शिक्षकांनी जोडीदाराच्या शाळेपासून ३० कि.मी. अंतराबाबत सदर केलेले प्रमाणपत्र / दाखला याची पडताळणी गट शिक्षण अधिकारी यांचे द्वारा तालुका स्तरावर करण्यात यावी.
- अवघड क्षेत्रात ज्या शिक्षकांची सलग सेवा 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झालेली असेल व सध्याच्या शाळेतील सेवा 5 वर्ष किंवा अधिक झाली असेल अश्या शिक्षकांचा समावेश बदली पात्र शिक्षकांच्या संवर्गात घेण्यात येईल.
- आंतरजिल्हा बदली प्रक्रियेअंतर्गत ना हरकत प्रमाणपत्र हा संवर्ग रद्द करण्यात येत आहेत. त्यानुसार या पूर्वी ज्या शिक्षकांनी संबंधित जिल्हा परिषदेकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त केलेले असेल असे कोणतेही प्रमाणपत्र पात्रता निश्चित करण्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
- आंतर जिल्हा बदली प्रक्रिये अंतर्गत शिक्षकांची कार्यमुक्ती व बदलीच्या जिल्ह्यातील रुजू होणेबाबत कार्यवाहीसाठी कालावधी निश्चित करून त्यानुसार आवश्यक अंमलबजावणी | संबंधित सर्व जिल्ह्यांनी करणे अनिवार्य आहे. सदर कालावधी हा 15 दिवसांचा निश्चित असावा