New Education Policy : शैक्षणिक वर्ष 2023 24 पासून राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 ची अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती नुकतीच शालेय शिक्षणमंत्री यांनी दिली, जून 2023 पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात इंजिनिअरिंग चे शिक्षण मराठी मधून दिले जाणार आहे, त्यामुळे मराठी माध्यमाच्या मुलांना याचा लाभ मिळणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरण येत्या शैक्षणिक वर्षांपासून - शिक्षणंत्री यांची माहिती
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) येणाऱ्या शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू करण्यात येणार आहे.
इंजिनिअरिंग आणि तांत्रिक शिक्षण मराठीत
शैक्षणिक धोरणातील बदलानुसार आता तांत्रिक शिक्षण आणि इंजिनियरिंग चे शिक्षण मराठीत दिले जाणार आहे, पुढे मेडिकल चे शिक्षण देखील मराठीत देण्याबाबत विचार सुरू आहे, याचा फायदा मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना होणार आहे.
महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतात ही क्रांती घडत आहे. या क्रांतीचे प्रणेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जून 2023 पासून
शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारी बदल म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण 2020, केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने 6 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF 2023) अंतिम मुसदा जाहीर करण्यात आला आहे.
एनसीएफ NCF PDF 2023 आराखडा संदर्भात नुकतेच शिक्षण मंत्रालयाने अभिप्राय, सूचना व शिफारशी मागवल्या आहेत. तुम्ही देखील तुमचा अभिप्राय देऊ शकता त्यासाठी येथे पहा.
असे असेल नवीन शैक्षणिक स्तर संरचना
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy) यामध्ये 5+3+3+4 अशी नविन संरचना असणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील पहिली पाच वर्ष यामध्ये पूर्वप्राथमिक, आणि पहिली व दुसरी इयत्तेचा समावेश असणार आहे.
पुढील तीन वर्षांत तिसरी ते पाचवी आणि त्यापुढील सहावी ते आठवी चा शैक्षणिक स्तर असणार आहे.
शेवटची चार वर्ष ही नववी ते बारावी अशा पद्धतीने शालेय शिक्षणाचे एकूण चार स्तरात विभागणी असणार आहे. सविस्तर येथे वाचा
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मुख्य मुद्दे येथे पहा
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार असा असेल अभ्यासक्रम
अभ्यासक्रमातील ओझे कमी करून खेळ, कृती व शोध आधारित अभ्यासक्रम असणार आहे.त्याचप्रमाणे संबोध, आकलन, उपयोजनावर भर, गणिती दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशील विचार, चिंतनशिल विचार, सहसंबंधात्मक अध्ययन, संवाद कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम असेल.
केवळ पाठांतर करून परीक्षेत मिळणाऱ्या गुणांचे अवास्तव महत्त्व कमी करून कौशल्य व क्षमता विकसनावर भर देण्यात येणार आहे.
अध्ययन निष्पत्तीच्या आधारे मुलांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. केवळ गुण न नोंदविता क्षमता / कौशल्य विकसनाची स्थिती प्रगती पुस्तकात नोंदवून सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेला चालना दिली जाणार आहे.
त्याचप्रमाणे बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमाची निर्मिती केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वतंत्र्य दिले जाणार आहे. सविस्तर येथे वाचा
नवनविन अपडेट साठी समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.