National Curriculum Framework Recommend 2023 : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या अंमलबजावणी साठी सुरुवात झाली असून, नुकतेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (National Curriculum Framework 2023) चा अंतिम मसुदा गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार 10 वी आणि 12 वी परीक्षेचे (SSC HSC Exams) मूल्यमापन हे फक्त वार्षिक परीक्षेच्या आधारे न करता सत्र (Semester) पद्धत लागू करण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे. तसेच बारावीच्या अंतिम निकाल तयार करताना 11 वी चे गुण देखील विचारात घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. याबाबत National Curriculum Framework Recommend काय आहेत? सविस्तर माहिती पाहूया..
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF 2023) जाहीर
National Education Policy 2020 नुसार राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF 2023) जाहीर झाल्यानंतर दहावी आणि बारावी परीक्षा कशा होणार? याबाबत पालक विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये चर्चा सुरु झालेली आहे, NCF आराखडा नुसार या परीक्षा आता सेमिस्टर पद्धतीने घेण्यात येणार असल्याची शिफारस करण्यात आली आहे.
तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील संरचना नुसार आता नववी ते बारावी असा एक शैक्षणिक स्तर असणार आहे. (NEP संरचना येथे पहा)
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF 2023) हा मसुदा अंतिम नसून यावर अभिप्राय आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. तुम्ही देखील तुमचा अभिप्राय आणि सूचना सरकारला पाठवू शकता त्यासाठी येथे क्लिक करा.
दहावी बारावी सेमिस्टर पद्धती परीक्षा कधीपासून होणार लागू ?
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ाचा (NCF) चा अंतरिम मसुदा जाहीर करण्यात आला आहे. इस्रोचे प्रमुख के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली NCF आरखडा तयार करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने जाहीर केलेल्या या आराखडय़ावर सूचना, शिफारसी आणि अभिप्राय मागवण्यात आले आहेत.
हा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा असून, यावर आता राज्य अभ्यासक्रम आराखडा संदर्भात राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर, राज्य सरकार दहावी, बारावी च्या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या ? याबाबत धोरण निश्चित करेल आणि त्यानुसार राज्य मंडळाला निर्देश देईल. त्यानंतर अंतिम मसुदा जाहीर होईल.
NCF च्या संदर्भात मागवलेल्या सूचना व शिफारशी यांचा विचार करून आनुषंगिक बदल विचारात घेऊन अंतिम आराखडा जाहीर करण्यात येईल. त्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षांपासून म्हणजेच 2024 25 पासून हा बदल लागू होण्याची शक्यता आहे. तुम्ही देखील याबाबत तुमचे अभिप्राय सूचना पाठवू शकता.
NCF 2023 नुसार दहावी बारावी परीक्षा कशा होणार ?
सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार होणाऱ्या वार्षिक परीक्षेची जागा आता सेमिस्टर पद्धती घेणार का? याबाबत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 नुसार एका शैक्षणिक वर्षात दोन वेळा Semester पद्धतीनुसार परीक्षा घ्याव्यात अशी शिफारस National Curriculum Framework मध्ये करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना आता बारावी ची परीक्षा देताना 16 विविध अभ्यासक्रमांचे विषय घेण्याची मुभा असणार आहे, म्हणजेच आवडीनुसार विद्यार्थी अभ्यासक्रम निवडू शकणार आहेत.
कोरोना महामारी च्या दरम्यान अशाप्रकारे सेमिस्टर पद्धतीने परीक्षा घेण्याचा प्रयोग CBSE आणि ICSE बोर्डाकडून करण्यात आला आहे. मात्र दहावी बारावी परीक्षा याबाबत अंतिम निर्णय घेताना शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचे अभिप्रायसुद्धा जाणून घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर राज्य सरकार या प्रकारच्या परीक्षा बाबत कशा पद्धतीने बदल करून निर्णय घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
National Curriculum Framework PDF
नवनविन अपडेट साठी समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.