MSCE Scholarship Result 2023 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अखेर दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी जाहीर करण्यात आला आहे, त्यानुसार आता पालकांना तसेच शाळांना Scholarship Result पाहता येणार असून, विद्यार्थ्यांच्या गुणांची पडताळणी करावयाची असल्यास ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे, इयत्ता 5 वी व 8 वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Exam) राज्यामध्ये दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती.
पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ.5 वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी जाहीर करण्यात आला आहे.
गुणपडताळणीसाठी 'या' तारखेपर्यंत करावा लागणार ऑनलाईन अर्ज
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दिनांक 29 एप्रिल 2023 ते 9 मे 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता 50 रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी / ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादी मध्ये दुरुस्तीसाठी 9 मे 2023 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीन मध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत.
विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत कळविण्यात येईल.
विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज, निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
शिष्यवृत्ती परीक्षेचा रिझल्ट पाहण्यासाठी डायरेक्ट लिंक
इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, MSCE च्या अधिकृत वेबसाईट www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे.
शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून पाहता येईल. तर पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.