MPSC Hall Ticket 2023 : MPSC संयुक्त पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, 'येथे' करा डाऊनलोड डायरेक्ट लिंक

MPSC Combine Exam Hall Ticket 2023 : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेवारांसाठी एक महत्वाची अपडेट अशी आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC Exam 2023 अंतर्गत महाराष्ट्र अराजपत्रित ग्रुप बी व ग्रुप सी या पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे MPSC Combine Exam Hall Ticket 2023 जाहीर करण्यात आले आहे, उमेदवारांना आता प्रवेशपत्र (Admit Card) डाऊनलोड करता येणार आहे, एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे.

MPSC संयुक्त पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

MPSC Hall Ticket 2023

महाराष्ट्र अराजपत्रित गट व व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (MPSC Hall Ticket) प्रवेश प्रमाणपत्राबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार 30 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांचे प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील त्यांच्या लॉगिन खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सर्वसाधारण सूचना

आयोगाच्या प्रसिद्ध पत्रकात नमूद केलेल्या सर्वसाधारण सूचना पुढील प्रमाणे

  • परीक्षा केंद्रावर परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
  • परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतः च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
  • परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. 
  • कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे.
  • आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील 'Guidelines for Examination' या सदराखाली उपलब्ध असलेल्या 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना' यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. 
  • सदर सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल. 
  • प्रवेशप्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- secretary@mpsc.gov.in a support online@mpsc.gov.in या ईमेल व अथवा १८०० १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरून विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

MPSC संयुक्त पूर्व परीक्षेचे हॉल तिकीट 'येथे' करा डाऊनलोड डायरेक्ट लिंक

MPSC संयुक्त पूर्व परीक्षा Hall Ticket 2023 Download करण्यासाठी mpsconline.gov.in या डायरेक्ट लिंक वर लॉगीन करून प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड करू शकता. पुढील स्टेप Follow करा.

हॉल तिकीट 'येथे' करा डाऊनलोड डायरेक्ट लिंक

MPSC संयुक्त पूर्व परीक्षेचे हॉल तिकीट 'असे' करा डाऊनलोड

  • एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्यांनतर लॉगिन या बटणावर क्लिक करा.
  • Login करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून Captcha कोड टाका आणि लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर My Account या पर्यायावर क्लिक करा.
  • तिथे तुम्ही भरलेल्या सर्व परीक्षेची नावे दिसतील तिथून तुम्ही एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा View या बटणावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला Admit Card असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही हॉल तिकीट डाऊनलोड करू शकता.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

संबंधित लेख
नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now