Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2023 : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील विमा संरक्षण 1.5 लाखावरून 5 लाख रुपये करण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. यामुळे आता रुग्णांना पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत घेता येणार आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करण्यात आले आहे. Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2023 साठी लाभार्थी पात्रता, MJPJAY Disease List व Hospital List (आजारांची यादी व हॉस्पिटल यादी) लाभ कसा घ्यावा? याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया..
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना काय आहे ? | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2023
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वपूर्ण आरोग्य विमा योजना आहे. या योजनेंतर्गत जवळपास 996 आजारांवर सरकारी व खाजगी रुग्णालयांच्या मार्फत पात्र लाभार्थ्यांना मोफत वैद्यकीय उपचार घेण्याची सुविधा देण्यात येते. त्यासाठी विमा मर्यादा निश्चिंत करण्यात आलेली आहे, ती पुढे दिलेली आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही योजना यापूर्वी 'राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना' या नावाने ओळखली जात होती, या योजनेमध्ये राज्यातील 2.22 कोटी लाभार्थी कुटुंबांना मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहे.
आयुष्मान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची आरोग्य विमा आणि महाराष्ट्र सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजना एकत्रितरित्या सुरु करण्यात आली आहे.
सन 2020 पासून सुधारित एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात राबविण्यात येत आहे.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना 2017 पासून आता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ( MJPJAY) या नावाने ओळखण्आयात येत आहे.
MJPJAY विमा कंपनी
सन 2020 पासून एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनी (United India Insurance Company) या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील लाभार्थीं पात्रता
राज्यात यापूर्वी केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र यापुढे राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र प्राप्त नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त झाले आहे. केंद्र व राज्याची एकत्रित योजना राबविणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे.
MJPJAY वार्षिक विमा संरक्षण लाभ आता 5 लाख मिळणार
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY)
MJPJAY या विमा पॉलिसी अंतर्गत लाभार्थ्यावर प्रति कुटुंब 1 लाख 50 हजार पर्यंत लाभ मिळत होता, मात्र आता राज्य सरकारने ही मर्यादा वाढवून 5 लाख इतकी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा प्रति कुटुंब प्रति पॉलिसी वर्ष 2.5 लाखाहून 4 लाख इतकी वाढविण्यात आली आहे.
#महात्मा_ज्योतिराव_फुले_जन_आरोग्य_योजनेतील विमा संरक्षण दीड लाखावरून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय #राज्य_शासनाने घेतला आहे. यामुळे रुग्णांना आता पाच लाखांपर्यंतचे #उपचार घेता येणार आहेत. #MaharashtraGovt #Insurancecoverage @TanajiSawant4MH @CMOMaharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/boJxpSS6gh
— Maha Arogya IEC Bureau (@MahaHealthIEC) April 11, 2023
महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Disease List
महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत 30 निवडक विशेष सेवांतर्गत 971 प्रकारचे गंभीर व अधिक खर्चिक उपचार व 121 शस्त्रक्रिया पश्चात MJPJAY Disease List आजारांवर उपचार व (फॉलोअप) समावेश असून लाभार्थी रुग्णांना अंगीकृत शासकीय व खाजगी रुग्णालयामधून रोख रक्कमरहित (कॅशलेस) या वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येतात.
महात्मा फुले जन आरोग्य योजना 996 आजारांची यादी येथे पहा
MJPJAY योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हानिहाय दवाखाण्याची यादी | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Hospital List
महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये जवळपास विविध आजारांवर असे एकूण 996 आजारांवर उपचार करण्यासाठी शासकीय व खाजगी रुग्णालये समाविष्ट असून जिल्हानिहाय दवाखाण्याची यादी पुढीलप्रमाणे पहा.
- MJPJAY Hospital List पाहण्यासाठी सर्वप्रथम www.jeevandayee.gov.in या शासनाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या
- होम पेज वर गेल्यानंतर अंगीकृत रुग्णालय या पर्यायावर क्लिक करा
- आता त्यामधून तुम्ही जिल्हानिहाय किंवा आजारानुसार एक पर्याय निवडा
- त्यानंतर तुमचा जिल्हा निवड करून हॉस्पिटल ची यादी पहा
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Hospital List
{getButton} $text={Hospital List} $icon={link}
MJPJAY योजनेच्या लाभासाठी कशी करावी नोंदणी?
महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा (MJPJAY) लाभ घेण्यासाठी हॉस्पिटल मध्ये आरोग्य मित्र असतात. योजनेमध्ये अंगीकृत असणाऱ्या सर्वच रुग्णालयांत हे उपलब्ध असतात. आरोग्यमित्र रुग्णांची ऑनलाईन नोंदणी करतात. तसेच रुग्णालयात उपचार घेताना योग्य ती मदतही ते करत असतात.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना GR येथे पहा