Maharashtra School Holiday News 2023 : राज्यातील विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की, वाढत्या तापमानामुळे सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे, त्यामुळे राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना School Holiday उन्हाळी सुट्टी व (New Academic Year 2023 24) पुढील शैक्षणिक वर्षातील शाळा सुरू करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण परिपत्रक शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे, त्यानुसार आता उन्हाळी सुट्टी ही 21 एप्रिल 2023 पासून लागणार असून नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा या 15 जून 2023 रोजी सुरू होणार आहे, तर विदर्भात तापमान जास्त प्रमाणामध्ये असते, त्यामुळे विदर्भातील शाळा या 30 जून 2023 रोजी सुरू करण्याबाबत कळवण्यात आले आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया..
राज्यातील शाळांना 21 एप्रिल पासून उन्हाळी सुट्टी जाहीर
महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक School Holiday शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्यार्थ्यांना सुटी जाहीर, शालेय शिक्षण विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
राज्यातील शाळांना 21 एप्रिल पासून सुट्ट्या लागणार असून, पुढील शैक्षणिक वर्ष 2023 24 मध्ये शाळा या 15 जून रोजी सुरू होणार आहे.
शाळांचा निकाल 'या' तारखेला होणार जाहीर
प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांचा निकाल हा 29 एप्रिल 2023 रोजी अथवा सुट्टीच्या कालावधीत जाहीर करण्याबाबत परिपत्रकामध्ये कळवण्यात आले होते, मात्र अचानक सुट्टी जाहीर झाल्यामुळे आता निकाल हा विद्यार्थी, पालकापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ही संबंधीत शाळांवर सोपवण्यात आली आहे.
शाळांच्या सुट्ट्या समायोजित करण्यासाठी शिक्षणअधिकारी यांची परवानगी आवश्यक
शाळांच्या उन्हाळी व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक) यांच्या परवानगीने घ्यावी. असे कळविण्यात आले आहे.नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा 15 जून रोजी तर विदर्भातील शाळा 30 जून 2023 रोजी सुरू होणार
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना 21 एप्रिल 2023 पासून सुट्टी जाहीर करण्यात आली असून, राज्यातील (New Academic Year 2023 24) नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा या 15 जून 2023 रोजी सुरू होणार आहे. तसेच विदर्भामध्ये तापमान अधिक असल्यामुळे विदर्भातील शाळा या 30 जून रोजी सुरु होणार आहे.नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.