MAHA Teacher Recruitment 2023 : राज्यातील शिक्षक भरती संदर्भात एक महत्वाची बातमी, शालेय शिक्षण मंत्री यांनी एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिक्षक भरती बाबत मोठा खुलासा केला आहे, शिक्षक भरती मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना लवकरच नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहे, शैक्षणिक वर्ष 2023 24 मध्ये हे नवीन शिक्षक संबंधित शाळेत रुजू होणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री दीपक केसरकर यांनी मीडियाला दिली.
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार
बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेली शिक्षक भरती आता अंतिम टप्प्यात आली असून, नुकतीच टीईटी (TET) पास उमेदवारांनी शिक्षक भरतीसाठी 'टेट' (TAIT) परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने दिली आहे.
त्यानंतर TAIT परीक्षेचा निकाल देखील जाहीर करण्यात आला आहे. व पात्र उमेदवारांकडून पवित्र पोर्टल मधून रिक्त पदांनुसार शाळेचा प्राधान्यक्रम भरून घेण्यात आलेला आहे. आता लवकरच या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहे.
चालू शैक्षणिक वर्षात 30 हजार नवे शिक्षक रुजू होणार..
— Deepak Kesarkar (@dvkesarkar) April 28, 2023
चालू शैक्षणिक वर्षात जवळपास 30 हजार शिक्षक वेगवेगळ्या शाळांमध्ये रुजूही होतील.
.
.
. #DeepakKesarkar #EducationMinister #Maharashtra #PrimarySchool #PrimaryTeacher #TeachersRecruitment #Appointment pic.twitter.com/0nuSxBRYCL