Krushi Vibhag Bharti Maharashtra 2023 : सरकारी नोकरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता कृषी विभागात विविध पदांची भरती निघाली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभागामार्फत लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी) (Short Typist, Stenographer (Lower Grade Stenographer (Higher Grade) या संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात देण्यात आली आहे. यामध्ये एकूण 60 जागा भरल्या जाणार असून, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ जुलै 2023 आहे. याबद्दल सविस्तर माहिती पाहूया..
पदाचे नाव आणि रिक्त पदे
- लघु टंकलेखक (Short Typist) - एकूण जागा 28
- लघुलेखक Stenographer (Lower Grade) - एकूण जागा 29
- लघुलेखक Stenographer (Higher Grade) - एकूण जागा 03
पदनिहाय आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता
लघु टंकलेखक (Short Typist)
- माध्यमिक शाळा (SSC) परीक्षा उत्तीर्ण (10 वी पास)
- लघुलेखनाचा (शॉर्ट टायपिंग) वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट
- इंग्लिश टंकलेखनाचा (टायपिंग) वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा
- मराठी टंकलेखनाचा (टायपिंग) वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट
- या पदासाठी शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
लघुलेखक Stenographer (Lower Grade)
- माध्यमिक शाळा (SSC) परीक्षा उत्तीर्ण (10 वी पास)
- लघुलेखनाचा (शॉर्ट टायपिंग) वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट
- इंग्लिश टंकलेखनाचा (टायपिंग) वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा
- मराठी टंकलेखनाचा (टायपिंग) वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट
- या पदासाठी शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
लघुलेखक Stenographer (Higher Grade)
- माध्यमिक शाळा (SSC) परीक्षा उत्तीर्ण (10 वी पास)
- लघुलेखनाचा (शॉर्ट टायपिंग) वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट
- इंग्लिश टंकलेखनाचा (टायपिंग) वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा
- मराठी टंकलेखनाचा (टायपिंग) वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट
- या पदासाठी शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
आवश्यक वयोमर्यादा
सरकारी भरती नियमानुसार या पदासाठी किमान 18 ते 40 वर्षे (आरक्षित प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट)
ऑनलाईन अर्जासाठी फी
लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना खालील प्रमाणे फी भरावी लागणार आहे.
परीक्षा फी - 720 रुपये (आरक्षित प्रवर्गासाठी ६५० रुपये)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज सुरुवात – 6 एप्रिल 2023
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2023
ऑनलाईन अर्ज येथे करा
उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यासाठी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा , तसेच ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना येथे पहा [संपूर्ण जाहिरात मराठी येथे डाउनलोड करा]
संबधित लेख