सरकारी नोकरी : विद्यार्थ्यांनो तयारीला लागा, जलसंपदा विभागात 5570 पदांसाठी मेगा भरती; पदांचा तपशील येथे पहा..

Jalsampada Vibhag Bharti 2023 : राज्यातील जलसंपदा विभागातील भरती बऱ्याच दिवसांपासून रखडली होती, मात्र आता जलसंपदा विभागाच्या भरतीची वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे जलसंपदा विभागाच्या सरळसेवा भरती सन 2023 (Jalsampada Vibhag Recruitment) रिक्त असलेली एकूण 5 हजार 570 पदांची मेगा भरती जाहिरात लवकरच येणार आहे, पदनिहाय जागा किती असणार आहेत? याबाबतची माहिती पाहूया..

 जलसंपदा विभागातील रिक्त पदासाठी लवकरच भरती

Jalsampada Vibhag Bharti 2023
Jalsampada Vibhag Bharti 2023

जलसंपदा विभागातील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने जलसंपदा विभागाला कळविले आहे. त्यानुसार जलसंपदा विभागात सरळसेवेने विविध पदांसाठी भरती होणार असून, त्यामध्ये एकूण 5570 जागा भरण्यात येणार आहे.

जानेवारी महिन्यामध्ये जलसंपदा विभागातील रिक्त भरणे बाबत समन्वय समिती ची स्थापना करण्यात आली होती, या समितीच्या अहवालानुसार आता राज्यातील जलसंपदा विभागातील रिक्त पदासाठी लवकरच भरती होणार आहे.

जलसंपदा विभागातील भरती पदांचा तपशील

राज्यातील गट ब संवर्गातील पदासाठी एकूण 1 हजार 76 पदांची भरती करण्यात येणार असून, गट क संवर्गातील एकूण 4 हजार 494 पदे भरण्यात येणार आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे

जलसंपदा सरळसेवा भरती गट ब (अराजपत्रित)

  1. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 897 
  2. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)  - 155 
  3. कनिष्ठ अभियंता (विद्युत व यांत्रिकी) - 20 
  4. वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक - 04 
  • एकूण - 1076

जलसंपदा सरळसेवा भरती गट क (अराजपत्रित)

  1. निम्नश्रेणी लघुलेखक - 19 
  2. भू-वैज्ञानिक सहाय्यक - 05
  3. कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक - 14
  4. आरेखक - 25 
  5. सहाय्यक आरेखक - 60
  6. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक - 1528
  7. अनुरेखक - 284 
  8. प्रयोगशाळा सहाय्यक - 35
  9. सहाय्यक ग्रंथपाल -1 
  10. सहाय्यक भांडारपाल - 138
  11. कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक - 8
  12. दप्तर कारकून - 430 
  13. मोजणीदार - 758
  14. कालवा निरीक्षक - 1189
  • एकूण - 4494

एकूण पदांचा तपशील

  • गट ब (अराजपत्रित) -1076
  • गट क (अराजपत्रित) - 4494
  • एकूण - 5570

जलसंपदा विभाग भरती अपडेट

जलसंपदा विभागातील विविध पदांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांनी या भरतीबाबत अधिकच्या माहितीसाठी जलसंपादन विभागाच्या https://wrd.maharashtra.gov.in/ या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.


हे सुद्धा पहा

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                              

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now