नागरिकांचे मंत्रालयीन कामकाज होणार सोपे; सरकारी काम जलद आणि पारदर्शक करण्यासाठी 'मंत्रालयात' टपाल स्वीकृती केंद्राची स्थापना पहा..

Goverment Postal Acceptance Centre : राज्यातील नागरिक आपल्या विविध कामासाठी मंत्रालयात (Mantralaya Mumbai) जात असतात, मात्र त्यावर लवकर कार्यवाही होण्यास वेळ जातो, यासाठी आता राज्य शासनाने सामान्य नागरिकांच्या टपालावर जलद गतीने कार्यवाही व्हावी यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता सरकारी काम लवकर आणि पारदर्शक होईल अशी सर्वसामान्य जनतेला आशा आहे. याबद्दल सविस्तर माहिती येथे वाचा..

शासकीय कामकाज आता होणार पेपरलेस (E-Office)

Goverment Postal Acceptance Centre

राज्यातील नागरिकांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी शासन नेहमी प्रयत्नशील असते, आता यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती टपाल स्वीकृती केंद्र (Mantralaya Mumbai) येथे स्थापन करण्यात येणार आहे.

सध्या 21 व्या शतकातील तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी जनतेची काम जलद आणि पारदर्शक होण्यासाठी मंत्रालयातील सर्वसामान्य जनतेचे कामे पेपरलेस (E-Office) द्वारे होणार आहे.

म्हणजेच नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने शासनाकडे पत्रव्यवहार करून त्याची सद्यस्थिती घरबसल्या कळणार आहे, यासाठी शासनाचा कारभार पारदर्शक होण्यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात E-Office होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असून, शासनाचा कारभार हा लवकरच कागद विरहित म्हजेच (Paperless) करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव यांनी दिली.

बाल संगोपन योजना 2023 : 'या' मुलांना मिळणार महिन्याला 2 हजार 250 रूपये 

अखेर ! 'आरटीई' 25 टक्के लॉटरी ची तारीख 'पोर्टल' वर केली जाहीर

असे काम करेल मध्यवर्ती टपाल स्वीकृती केंद्र

सर्वसामान्य नागरिकांचे मंत्रालयातील विविध प्रशासकीय विभागांतील कामासाठी टपाल नागरिकांकडून पाठविण्यात येतात, तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून देखील प्रशासकीय कामकाजाचे टपाल पाठविण्यात येतात, ते स्वीकारण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांमध्ये प्राप्त होणाऱ्या टपालांवर तत्काळ कार्यवाही व्हावी व वेळेचा अपव्यव टाळण्यासाठी लवकरच टपाल केंद्र उभारण्यात येणार आहे. 

यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील पत्रव्यवहार करताना प्रत्येक टपाल ई- ऑफिसच्या माध्यमातून पाठविण्यासाठी  ई-ऑफिस प्रणालीचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत राज्याच्या अपर मुख्य सचिव यांनी दिली.

शासकीय विभाग निहाय असणार मंत्रालयात मध्यवर्ती टपाल स्वीकृती केंद्र 

मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील कामासाठी फक्त टपाल देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून आणि क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांद्वारे प्राप्त होणारे टपाल स्वीकारण्यासाठी कार्यालयीन वेळेत मंत्रालयाच्या मध्यवर्ती टपाल केंद्रात टपाल स्वीकृतीसाठी विभाग व कार्यालय निहाय  व्यवस्था करण्यात आली आहे. 

जुनी पेन्शन योजना लेटेस्ट न्यूज 

टपालावर होणार अशा पद्धतीने कार्यवाही

टपाल स्वीकृती केंद्रामध्ये संबंधित विभागाने स्वीकारलेले टपाल हे Scanned करुन ते संबंधित प्रशासकीय विभागाच्या नोंदणी शाखेस ई-ऑफिसद्वारे ऑनलाईन पाठविण्यात येईल, याकरिता मध्यवर्ती टपाल केंद्रातील विभागांकरिता स्वतंत्र ई-खाते एनआयसी (NIC) मार्फत तयार करण्यात येणार आहे.

नोंदणी शाखेस e-office प्रणालीद्वारे ऑनलाईन पाठविण्यात आलेल्या टपालावर संबंधित विभागाने e-office प्रणालीच्या माध्यमातून कामकाज करणे अपेक्षित आहे.

मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांमार्फत पाठविण्यात येणारे जे टपाल (उदा. नकाशे, पुस्तके इ.) ई-ऑफिसच्या माध्यमातून पाठविणे शक्य नाही, असे टपाल समक्ष स्वीकारले जाईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

'आपले सरकार' वेब पोर्टलवर मिळणार 511 सेवेंचा लाभ

तुम्हाला माहिती असेल 'आपले सरकार' वेब पोर्टलच्या माध्यमातून 387 प्रकारच्या ऑनलाईन सेवा दिल्या जातात, आता यामध्ये अजून सेवा जोडणार असून 511 प्रकारच्या सेवेचा लाभ आपले सरकार या पोर्टल वर घेता येणार आहे.

सरकारी योजनेचे जास्तीत जास्त लाभ योग्य पात्र लाभार्थ्यांना जलद आणि पारदर्शक पणे मिळावे यासाठी आपले सरकार या पोर्टल ची लोकप्रियता पाहता यामध्ये अजून 124 सेवेंचा समावेश करण्यात येणार आहे.

तसेच सर्वसामान्य नागरिकांना आपले अर्ज दाखल केल्यापासून सेवा सहज मिळाव्यात यासाठी 'मोबाईल ॲप' देखील सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे.

महत्वाच्या योजना

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                              
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now