DA Hike Latest News : सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, मार्च महिन्यात केंद्र सरकारने Central Government Employees यांच्या महागाई भत्ता (DA Hike) हा 38 टक्क्यावरून 42 टक्के केला आहे. याच धर्तीवर आता State Government Employees यांच्या महागाई भत्यात देखील वाढीचा निर्णय राज्य शासन कधी घोषित करणार? याकडे राज्यातील सरकारी कर्मचारी व निवृत्ती पेन्शनधारकांचे लक्ष लागून आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 4 टक्के वाढ
केंद्र शासनाने मार्च महिन्यात Central Government Employees यांचा महागाई भत्ता हा 4 टक्क्याने वाढवण्यात आला, त्यानुसार आता DA हा 38 टक्क्यावरून 42 टक्क्यावर पोहचला आहे. ही वाढ 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आली असून, जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे DA Hike वाढ ही मार्च/एप्रिल च्या महिन्यात देण्यात येत आहे. या महत्वपूर्ण निर्णायामुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळाला असून,आता यापुढील महागाई भत्ता 7th Pay Commission DA Increase वाढ ही जुलै 2023 पासून जाहीर होणार असून ही वाढ देखील 4 टक्के होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रापाठोपाठ 'या' राज्यातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात घेतला वाढीचा निर्णय
महागाई भत्ता (Dearness Allowance) हा साधारणपणे वर्षातून दोन वेळा वाढवण्यात येतो. त्यानुसार केंद्र शासनाच्या निर्णयानंतर राजस्थान व हिमाचल प्रदेश राज्य सरकारने सरकारी कर्मचारी व निवृत्ती वेतन धारकांच्या महागाई भत्यात (DA Increase) वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कितीने वाढवला महागाई भत्ता येथे पहा..
केंद्राच्या पाठोपाठ आता राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष
महागाई भत्ता हा वर्षातून दोनदा वाढवण्यात येतो, हा Dearness Allowance निश्चित करण्यासाठी अखिल भारतीय घाऊक दर निर्देशांक आकडेवारी नुसार कामगार ब्युरो, कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा एक विभाग, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करतो.
अखिल भारतीय घाऊक दर निर्देशांक केंद्र सरकारने 17 एप्रिल 2023 रोजी आकडेवारी जाहीर केलेली असून पुढील आकडेवारी ही 15 मे 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानुसार आता महागाई चा दर लक्षात घेता केंद्रापाठोपाठ आता राज्यातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 4 टक्के वाढ लवकरच होऊ शकते.
सध्या राज्य सरकारी व निवृत्तीवेतन धारकांना 38 टक्क्याप्रमाणे महागाई भत्ता मिळत आहे. यामध्ये 4 टक्के वाढ केल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 42 टक्क्या पर्यंत पोहचणार आहे.